मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : कबड्डी सामन्यादरम्यान घडली भयंकर दुर्घटना; प्रेक्षकांनी खचाखच भरलेला स्टँड अचानक कोसळला

VIDEO : कबड्डी सामन्यादरम्यान घडली भयंकर दुर्घटना; प्रेक्षकांनी खचाखच भरलेला स्टँड अचानक कोसळला

दुसऱ्या व्हिडिओत जखमींना रुग्णालयात दाखल करीत असल्याचं दिसत आहे.

दुसऱ्या व्हिडिओत जखमींना रुग्णालयात दाखल करीत असल्याचं दिसत आहे.

दुसऱ्या व्हिडिओत जखमींना रुग्णालयात दाखल करीत असल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

तेलंगणा, 22 मार्च : सध्या सोशल मीजियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेलंगणातील असून एका कबड्डी सामान्यादरम्यानचा आहे. कबड्डी सुरू असताना प्रेक्षकांना स्टँड अचानक कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भर सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी खचाखच भरलेला प्रेक्षकांचा स्टँड अचानक खाली कोसळला. (VIDEO Terrible accident during kabaddi match The crowded stand suddenly collapsed )

या दुर्घटनेनंतर काहीजणं जखमी झाल्याची माहिती समोर आले आहेत. ही घटना तेलंगणा राज्यातील सुर्यापीथ येथील आहे. आसिफ खान यांनी यासंदर्भातील दोन व्हिडिओ शेअर केले आहे. हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

हे ही वाचा-

या दुर्घटनेत नेमके किती जणं जखमी झाले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसऱ्या व्हिडिओत जखमींना रुग्णालयात दाखल करीत असल्याचं दिसत आहे. या दुर्घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. खाली अडकलेल्यांना आधी वर काढण्यासाठी लोक प्रयत्न करू लागले. अचानक झालेल्या या घटनेतं बसण्यासाठी केलेलं स्टँड चांगल्या गुणवत्तेचं नसल्याची तक्रार केली जात आहे. काहींच्या मते मर्यादेपेक्षा जास्त प्रेक्षक बसल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र देशात कोरोनाचं संकट असताना असा प्रकार घडल्यांने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

First published:

Tags: Telangana, Video viral