मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फास्ट ट्रेनमधून स्टंट करताना शूट करीत होता Video; पाय घसरला अन् विद्यार्थ्याचा दुर्देवी अंत

फास्ट ट्रेनमधून स्टंट करताना शूट करीत होता Video; पाय घसरला अन् विद्यार्थ्याचा दुर्देवी अंत

विद्यार्थ्याच्या स्टंटचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्याच्या स्टंटचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्याच्या स्टंटचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    चेन्नई, 29 : तमिळनाडूतील (Tamilnadu News) चेन्नईत एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा फास्ट ट्रेनमधून पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी ट्रेनमध्ये मित्रांसोबत मिळून स्टंट करीत होता. त्यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेनमधून खाली पडला. हा विद्यार्थी तिरुविलंगाडू निवासी नीती देवन असल्याचं समोर आलं आहे. तो जो प्रेसीडेन्सी कॉलेजमध्ये बीए अर्थशास्त्राचं शिक्षण घेत होता. अपघातापूर्वी विद्यार्थ्याने स्टंटचा एक व्हिडीओ तयार केला होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यानत तो मित्रांसह मिळून ट्रेनमध्ये स्टंट करू लागला. ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकून सर्व मित्र मस्ती करीत होते. तेव्हा देवनचा पाय घसरला आणि तो फास्ट ट्रेनमधून खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या देवनला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वारंवार रेल्वेकडून धोकादायक स्टंट करू नये असं सांगण्यात येतं. मात्र तरीही मुलं अशा प्रकारचे स्टंट करतात. परिणामी यात अनेकांनी जीवही गमावला आहे. त्यामुळे तरुणांनी उत्साहाच्या भरात अशा प्रकारचे स्टंट करणं टाळायला हवं. चेन्नईतील या प्रकरणात तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंब हादरलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Railway, Viral video.

    पुढील बातम्या