कुणीतरी फेकून दिलेली चपाती त्यानं धुवून खाल्ली, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

कुणीतरी फेकून दिलेली चपाती त्यानं धुवून खाल्ली, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

एका वृद्धाचा नळावर चपाती धुवून खात असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. तसंच ताटात अन्न टाकू नये असंही सांगितलं जातं. अनेकदा मोठमोठ्या समारंभामध्ये अन्नाची प्रचंड नासाडी होते. त्याचवेळी काही लोक असेही असतात ज्यांना एकवेळ जेवण मिळत नाही. आता असाच एका वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये वृद्ध चक्क चपाती धुवून खाताना दिसत आहे. मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ भारतातला असला तरी नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकलेलं नाही. एका रेल्वेस्टेशनवर तो असल्याचं दिसतं. त्याच्या हातात चपाती असून तो नळावर येऊन चपाती धुत असल्याचं दृश्य दिसतं. चपाती धुतल्यानंतर ती खात असलेलंही व्हिडिओमध्ये दिसतं. एक हात अधु असलेल्या त्या वृद्धाचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

ट्विटरवर एका युजरने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, करत ‘ये भूख ही तो है, जो किसी से पेट भरने पर रोटी फिकवा देती है और किसी से उसी रोटी को दुबारा उठवा के धुलवा लेती है’त्यावर अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशी वेळ कोणावर येऊ नये अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

पाहा VIDEO : 'मला मरायचं आहे...', मानसिक छळाला कंटाळून 9 वर्षाच्या मुलाची आईकडे मागणी

व्हिडिओतील वृद्धाबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. चपाती धुवून खाण्याची वेळ त्याच्यावर का आली? चपाती कुठून आणली? कचऱ्यात होती का याबद्दल काहीच माहिती नाही. मात्र त्याच्या या व्हिडिओने अन्न नासाडी करणाऱ्यांसाठी एक मेसेज जरुर दिला आहे.

'ती' वाजवत राहिली वायोलिन, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 09:41 AM IST

ताज्या बातम्या