मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video : ग्राहकांची फसवणूक करताना महिलेचा Video व्हायरल, तुमच्यासोबतही घडू शकतो असा प्रकार

Viral Video : ग्राहकांची फसवणूक करताना महिलेचा Video व्हायरल, तुमच्यासोबतही घडू शकतो असा प्रकार

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आपण घरगुती सामान घेण्यासाठी बाजारात जात असतो. खास करुन भाजीपाला किंवा फळे घेण्यासाठी. अनेकदा लोक भाजीपाल्याच्या किमती कमी करण्यासाठी त्यांच्याशी हुज्जत घालताना पहायला मिळतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : आपण घरगुती सामान घेण्यासाठी बाजारात जात असतो. खास करुन भाजीपाला किंवा फळे घेण्यासाठी. अनेकदा लोक भाजीपाल्याच्या किमती कमी करण्यासाठी त्यांच्याशी हुज्जत घालताना पहायला मिळतात. मात्र विक्री करणारेही ग्राहकांची फसवणून करत असतात. आपल्या न कळत ते आपल्याला वेडं बनवतात. असाच काहीसा प्रकार समोर आला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भाजीपाला आणि फळविक्रेते लोकांना कसे फसवतात याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, फळ आणि भाजी मार्केट आहे. यामध्ये एक महिला फळे विकत आहे. एक ग्राहक महिला विक्री करणाऱ्या महिलेकडून काही फळे खरेदी करते. ग्राहक महिला चांगली फळे निवडून घेत आहे म्हणून विक्री करणारी महिलाही दिला मदत करत फळे घेऊ लागते. समोरच्या महिलेची खात्री पटल्यानंतर ती फळे भरत असताना अचनाक पिशवी बदलते आणि चांगल्या फळांऐवजी खराब फळे असलेली पिशवी वर करते. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

@TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाला असून याची सर्वत्र चर्चा पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर सध्या अनेक प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. त्यामुळे गोष्टी खरेदी करताना व्यवस्थित लक्ष देऊन गोष्टी घेणं गरजेचं असतं.

दरम्यान, असा फसवणूकीचा प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो त्यामुळे सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. अशी फसवणूक होण्याचा हा पहिलाच प्रकार नसून यापर्वीही असे अनेक फसवणूकीचे प्रकार समोर आले आहेत. अशा वाढत्या फसवणूकीच्या प्रकारांमुळे नागरिकही काही खरेदी करताना चिंतेत असतात. सध्या या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Shocking, Shocking news, Top trending, Video viral, Viral, Viral news