Home /News /viral /

...अन् जंगलात आपसात भिडले दोन वाघ; Tiger Fight चा जबदस्त Video Viral

...अन् जंगलात आपसात भिडले दोन वाघ; Tiger Fight चा जबदस्त Video Viral

व्हिडिओमध्ये (Video) पाहायला मिळतं, की दोन्ही वाघ (Tiget Fight) एकमेकांवर हल्ला करत आहेत. सुरुवातीला ते एकमेकांच्या जवळ येतात आणि मग शत्रूच्या ताकतीचा अंदाज घेतात

    नवी दिल्ली 10 ऑगस्ट : जंगलात गेल्यावर वाघाचा आवाज कानावर पडताच भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. अशात तुमच्या डोळ्यासमोरच दोन वाघ एकमेकांसोबत भिडले तर? सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video of Tiger Fight) होत आहे. हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. जंगलात दोन वाघांची झालेली ही लढाई कर्नाटकच्या नागरहोल नॅशनल पार्कमधील (Nagarhole National Park) आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकानं ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) बी एस सुरन नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन (Video Caption) दिलं गेलं, की आज नागरहोलमध्ये. VIDEO: डॅममध्ये बुडणाऱ्या मुलाला रिअल सिंघमनं काढलं बाहेर, पण डॉक्टर म्हणाले... व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोन्ही वाघ एकमेकांवर हल्ला करत आहेत. सुरुवातीला ते एकमेकांच्या जवळ येतात आणि मग शत्रूच्या ताकतीचा अंदाज घेतात. यानंतर दोघंही एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात करतात आणि आपल्या पंजाने एकमेकांना दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान वाघांचा आवाज संपूर्ण जंगलभर घुमत असल्याचं ऐकू येतं. ही लढाई परिसरावरुन झाल्याचं म्हटलं जात आहे. वाघ हा एक टेरिटोरियल प्राणी आहे आणि आपल्या परिसरात इतर वाघांची उपस्थिती त्याला अजिबातही सहन होत नाही. याच कारणामुळे वाघ स्वतःच्या जीवाची बाजी लावत आपल्या परिसराचं रक्षण करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील दोन्ही वाघ मेल असल्याचं म्हटलं जात आहे. या लढाईदरम्यान एका वाघानं दुसऱ्याच्या खांद्यावर इतक्या जोरात पाय दिला, की समोरचा वाघ जोरात जमिनीवर कोसळला. मात्र, दोघांमधील कोणीही हार मानण्यास तयार नाही. या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Tiger, Tiger attack

    पुढील बातम्या