मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: डोक्यात कचरापेटी टाकत विद्यार्थ्यांचं शिक्षकासोबत संतापजनक कृत्य, गुरूने दिलेली प्रतिक्रिया वाचून व्हाल थक्क

VIDEO: डोक्यात कचरापेटी टाकत विद्यार्थ्यांचं शिक्षकासोबत संतापजनक कृत्य, गुरूने दिलेली प्रतिक्रिया वाचून व्हाल थक्क

Students Assaulting a Teacher: व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विद्यार्थ्यी अचानक हिंदी शिकवत असलेल्या शिक्षकाजवळ जातात आणि त्यांच्या डोक्यात कटरापेटी टाकतात.

Students Assaulting a Teacher: व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विद्यार्थ्यी अचानक हिंदी शिकवत असलेल्या शिक्षकाजवळ जातात आणि त्यांच्या डोक्यात कटरापेटी टाकतात.

Students Assaulting a Teacher: व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विद्यार्थ्यी अचानक हिंदी शिकवत असलेल्या शिक्षकाजवळ जातात आणि त्यांच्या डोक्यात कटरापेटी टाकतात.

नवी दिल्ली 14 डिसेंबर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात विद्यार्थ्यांचा एक गट 59 वर्षीय शिक्षक प्रकाश बोगर यांच्यासोबत विचित्र मस्करी करताना दिसत आहे. ही घटना कर्नाटकच्या देवनागिरी जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुक्यातील नेल्लारू सरकारी विद्यालयातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे एका शिक्षकासोबत (Prakash Bogar) शाळेतील विद्यार्थ्यांनी असं कृत्य केलं जे पाहून सगळेच भडकले आहेत. मात्र, वयस्कर शिक्षकाने या मुलांना अशा धडा शिकवला, जो ते आयुष्यभर लक्षात ठेवतील.

हेही वाचा - गायीनं गिळली सोन्याची साखळी; शेणातूनही बाहेर न आल्यानं अखेर केलं हे काम

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारची आहे. जेव्हा कर्नाटकच्या एका सरकारी शाळेमध्ये दहावीत शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video of Students Assaulting a Teacher) झाला तेव्हा लोकांनी विद्यार्थ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. काहींनी या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सल्ला दिला. तर काहींनी या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाका, असं म्हटलं. प्रकाश बोगर पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या मुलांचं उज्वल भविष्य खराब करायला नको, असं त्यांचं म्हणणं आहे.

प्रकाश बोगर यांनी जे काही केलं ते फक्त एक गुरुच करू शकतो. त्यांनी लोकांना विनंती केली की त्या विद्यार्थ्यांना माफ करा. त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल करू नका आणि शाळेतून काढूनही टाकू नका. त्यांचं असं म्हणणं आहे की हे विद्यार्थी लहान आहेत आणि या वयात चुका होतात. त्यांना शाळेतून काढण्याची किंवा पोलिसांच्या ताब्यात देण्याची गरज नसल्याचं या शिक्षकाने म्हटलं. भविष्यात हे विद्यार्थी चांगलं काहीतरी करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विद्यार्थ्यांचा एक गट अचानक हिंदी शिकवत असलेल्या शिक्षकाजवळ जातात आणि त्यांच्या डोक्यात कटरापेटी टाकतात. इतकंच नाही तर हे शिक्षक जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा विद्यार्थी जाऊन त्यांना धमकी देतात आणि डोक्यात चापटही मारतात. तर दुसरा एक विद्यार्थी ही कचरापेटी पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावर टाकतो. इतकं सगळं होऊनही हे शिक्षक विद्यार्थ्यांना काहीच बोलत नाहीत आणि शांततेत मुलांना शिकवत राहतात.

हेही वाचा - झोपलेल्या प्रेयसीच्या पापण्या उघडून चोरले 18 लाख, प्रियकराची शक्कल वाचून हादराल

हा व्हिडिओ ट्विटर यूजर @Sharabh_Vishnu_ ने शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, कर्नाटकच्या शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला दिलेल्या त्रासाचा व्हिडिओ व्हायरल. बातमी देईपर्यंत शेकडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलं की या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करायला हवी, जेणेकरून पुन्हा कोणताही विद्यार्थी असं कृत्य करणार नाही.

First published:

Tags: School student, School teacher, Shocking video viral