पोलिसच निघाला चोर! रिक्षातून अंडी चोरताना कॅमेऱ्यात कैद, VIDEO VIRAL होताच निलंबन

पोलिसच निघाला चोर! रिक्षातून अंडी चोरताना कॅमेऱ्यात कैद, VIDEO VIRAL होताच निलंबन

एका हेड कॉनस्टेबलनं (Head Constable) रस्त्यावरील गाडीतील अंडी (Eggs) चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसाची ही चोरी तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद (Captured in Camera) केली

  • Share this:

चंदीगड 16 मे : पंजाबमधील एका एसएचओनं भाजीपाल्याच्या दुकानावर लाथ मारल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पंजाब पोलिसांची (Punjab Police) पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी चक्क एका हेड कॉनस्टेबलनं (Head Constable) रस्त्यावरील गाडीतील अंडी (Eggs) चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसाची ही चोरी तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद (Captured in Camera) केली आणि यानंतर ही घटना उघड झाली आहे.

हे प्रकरण चंदीगडपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या फतेहगड साहिब कसब्यातील आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे, की हेड कॉनस्टेबल असलेला पोलीस प्रीतपाल सिंह रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या एका गाडीमधील कॅरेटमधले अंडे घेऊन आपल्या खिशात भरत आहे. तसंच पोलीस जेव्हा ही चोरी करत आहे, तेव्हा रिक्षाचा मालक याठिकाणी उपस्थित नाही.

मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की अंड्याच्या कॅरेट रिक्षामध्ये असलेल्या रिक्षाचा मालक जेव्हा आपल्या गाडीजवळ येतो, तेव्हा लगेचच पोलीस दुसऱ्या एका रिक्षाला थांबण्याचा इशारा करत पुढे निघून जातो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर या पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. पंजाब पोलिसांनी स्वतः ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

पोलीस विभागानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, की एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात फतेहगड साहिबमधील पोलीस प्रीतपाल सिंह अंडे चोरताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जेव्हा या रिक्षाच्या मालक आपल्या गाडीजवळ नव्हता, तेव्हा त्यानं ही चोरी केली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर हेड कॉनस्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे तसंच चौकशीचे आदेश दिले आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: May 16, 2021, 2:44 PM IST

ताज्या बातम्या