Home /News /viral /

‘पण का? कशासाठी?’Parle-G ची बर्फी पाहून खाद्यप्रेमींची चिडचिड, पाहा VIDEO

‘पण का? कशासाठी?’Parle-G ची बर्फी पाहून खाद्यप्रेमींची चिडचिड, पाहा VIDEO

इंटरनेटवर व्हायरल होत असलेली पारले-जी बिस्किटाची बर्फी पाहून लोक चिडले आहेत. ते विचारतायत, ही बर्फी आम्ही का बरं खावी?

  नवी दिल्ली, 21 डिसेंबर: इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत असलेली पारले-जी बिस्कीटाची बर्फी (Parle G Barfi) पाहून खाद्यप्रेमींचं पित्त (Food Lovers Angry) खवळलं आहे. लोक बघत बसतात म्हणून कुठलेही पदार्थ बनवणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी काहीतरी तरतूद का केली जात नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कधी कुणी ओरियापासून भजी काय बनवतो, कधी कुणी कोल्डड्रिंकचा वापर करून पाणीपुरीच काय करतो.. हे सगळं कमी होतं म्हणून की काय आता एकाने चक्क पारले-जी बिस्किटापासून बर्फी बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
  बिस्किटाची बर्फी पारले-जी हे चहात बुडवून खाण्याचं ग्लुकोज बिस्कीट. अनेकांना मावा बर्फी, काजू बर्फी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी पसंत असतात. मात्र दिल्लीतील एका व्यक्तीनं चक्क पारले-जी पासून बर्फी तयार केली आहे. ही बर्फी पाहून बर्फीप्रेमींचं पित्त खवळलं आहे. ही बर्फी आम्ही का खावी, असा सवाल ते करत आहेत. अशी बनवली बर्फी ही बर्फी तयार करण्यासाठी त्याने प्रथम बिस्किटं तुपात तळून घेतली. त्यानंतर ग्राइंडरमध्ये टाकून ती दळून घेतली. एका भांड्यात मिल्क पावडर आणि दूध यांचं मिश्रण तयार केलं. ते उकळलं आणि त्यात बिस्किटाची पावडर टाकली. हे मिश्रण त्यानं एका ट्रेमध्ये बटर पेपरवर ओतलं आणि त्याच्या बर्फी तयार केल्या. हे वाचा- अवघ्या सात वर्षांचा चिमुकला कमवतो कोट्यवधी रुपये, कारण... लोकांच्या चित्रविचित्र प्रतिक्रिया आम्हाला हे पाहिल्यानंतरही जगण्याची ताकद परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करत एकाने धमाल उडवून दिली. तर रेसिपी भले किती चांगली असेल, तर पारले-जी पासून तयार केलेली बर्फी आम्ही का खावी, हा प्रश्न असल्याचं एकानं म्हटलं आहे. तर तिसऱ्या एका युजरनं असं म्हटलं आहे की या रेसिपीत बिस्किटावर केवळ हार्पिक टाकणंच आता बाकी होतं.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Food, Recipie, Video viral

  पुढील बातम्या