नवी दिल्ली 24 सप्टेंबर : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ मजेशीर (Funny Video) असतात, तर काही व्हिडिओ असे असतात ज्यावर विश्वासही बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्ही अनेकदा बकरीला घास खाताना पाहिलं असेल. बकरींचा उपयोगच मटण म्हणून ताटात वाढण्यासाठी केला जातो. मात्र, तुम्ही कधी अशी बकरी पाहिली का, जी मांसाहारी आहे (Non Vegetarian Goat) ? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल.
कपड्यांमुळे तरुणीची भलतीच फजिती; व्हिडिओ पाहताच मदतीसाठी ऑफिस सोडून पळत आला BF
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक मांसाहारी बकरी पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की आता इन्स्टाग्रामशिवाय इतरही अनेक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे.
हा व्हिडिओ पाहून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. व्हिडिओमध्ये एक बकरी समोर असलेल्या टोपलीतील मासे काढून खाताना दिसत आहे. बकरी अतिशय आरामात आणि मजेत मासे खाताना दिसत आहे. या मांसाहारी बकऱ्याला पाहून सगळेच हैराण झाले आहेत. बहुतेकदा तुम्ही बकरीला गवत, झुडपं आणि धान्य खाताना पाहिलं असेल. मात्र, ही बकरी वेगळी आहे. व्हिडिओमध्ये बकरी आरामात मासे खाण्याचा आनंद घेत असल्याचं दिसतं.
डोळे तपासायला गेलेली महिला निघाली भलत्याच आजाराची रुग्ण, रिपोर्ट पाहून झाली शॉक
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत म्हटलं, की कलयुगात हाच दिवस पाहायचा राहिला होता. एका यूजरनं म्हटलं, की मटणाला मासा खाताना पहिल्यांदाच पाहिलं. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ अनेकांनी शेअरही केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goat, Video Viral On Social Media