नवी दिल्ली, 30 मार्च : सोशल मीडियावर दिवसभरात अनेक व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्ये सर्व प्रकारच्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. आत्तापर्यंत कोणाच्या अंगावरुन पैसै ओवाळणे अंगावर पैसे टाकणे, अशा घटना समोर आल्या आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क पैशांचा पाऊसच पडलेला पहायला मिळतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत आहे. याचा नेमका काय विषय आहे याविषयी जाणून घेऊया.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कार्यक्रम सुरु आहे आणि लोक पैशांचा पाऊस करत आहेत. कार्यक्रम सुरु असून लोक नोटांवर नोटा फेकत आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. गुजरातमधील पालनपूर येथील हा व्हिडीओ असून या कार्यक्रमात लोकदयारोममधील गायकावर पैसे आणि चांदीच्या नाण्यांचा वर्षाव केला.
#गुजरात : गायकावर पैशांना पाऊस, सोनं आणि चांदीची नाणीही उधळली pic.twitter.com/TwPVbtQkYx
— News18Lokmat (@News18lokmat) March 30, 2023
पालनपूर येथे संत जलाराम बाप्पा प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त लोकदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. गुजराती लोक गायक कीर्तिदान गढवी यांना लोकडायरोसाठी पाचारण करण्यात आले होते. डेरोच्या काळात त्याच्यावर केवळ चलनी नोटाच नव्हे तर चांदीच्या नाण्यांचा वर्षाव झाला होता. सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये असाच काहीसा प्रकार पहायला मिळतोय. यापूर्वीही असे बरेच व्हिडीओ समोर आले आहेत.
दरम्यान, सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भीतीदायक, स्टंट व्हिडीओ व्हायरल होतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना चांगली पसंती देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral videos