Home /News /viral /

काम करता करता डान्स करत होती तरुणी, मागून आला बॉस आणि... पाहा VIDEO

काम करता करता डान्स करत होती तरुणी, मागून आला बॉस आणि... पाहा VIDEO

आपल्या कामाचा आनंद लुटत तरुणी ऑफिसमध्ये मनसोक्त डान्स करत होती आणि तेवढ्यात तिच्या मागे तिचा बॉस येऊन उभा राहिला. जेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं, तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती...

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर: नेहमीचं काम (Usual office work) करता करता एक तरुणी आपल्या ऑफिसमध्ये (Office) मनसोक्त डान्स (Dance) करत होती आणि तेवढ्यात तिचा बॉस (Boss) मागे येऊन उभा राहिला. सर्व भान विसरून आपल्याच धुंदीत डान्स करणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात ही तरुणी तिच्या कार्यालयात साफसफाई करताना मनसोक्त डान्स करत असल्याचं दिसत होतं. या व्हिडिओत काही क्षणानंतर एक व्यक्ती तिच्या पाठीमागे येऊन उभी राहत असल्याचं दिसतं आणि त्याला पाहिल्यावर तरुणीची प्रतिक्रिया पाहून सर्वांनाच तिचं कौतुक वाटलं होतं. तरुणीला वाटलं आश्चर्य ऑफिसमधील काम हे अनेकांना कंटाळवाणं वाटत असतं. कधी एकदा आपलं काम संपतं आणि आपण त्यातून रिकामे होतो, असं अनेकांना होऊन जातं. मात्र व्हिडिओत दिसणारी ही तरूणी आपलं काम मनापासून एन्जॉय करत असल्याचं दिसतं. खरं तर, या तरुणीचं काम होतं साफसफाई करण्याचं. अनेकांना हे काम बोअरिंग वाटत असतं. मात्र जर एखाद्याने त्याच्या कामात तल्लीन व्हायचं असं ठरवलं, तर कुठलंही काम बोअरिंग राहत नाही, हेच या तरुणीच्या डान्समधून दिसून येतं. मागे उभा राहिला बॉस आपलं काम करत करत कोरियन म्युझीकवर ठेका धरलेल्या या तरुणीचा व्हिडिओ सर्वांनाच आनंदी करणारा आहे. ती डान्स करण्यात इतकी गुंग आहे की पाठीमागे बॉस येऊन उभा राहिल्याचंही तिला समजत नाही. डान्स करता करता एका क्षणी तिचं लक्ष बॉसकडे जातं आणि ती एकदम डान्स थांबवते आणि लाजते. हे वाचा- Paytm द्वारे LPG Cylinder बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, पाहा काय आहे ऑफर प्रतिक्रियांचा पाऊस या तरुणीनं बॉसला पाहून लाजण्याची काहीच गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दिली आहे, तर व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही तिचा बॉस आहे की त्या ऑफिसमध्ये आलेला क्लाएंट आहे, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. प्रतिक्रिया काहीही असल्या तरी युजर्सना तिचा डान्स मात्र जाम आवडला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Dance video, Video viral

    पुढील बातम्या