• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'आधी मॅगी मग लग्न, नवरदेवाला सांगा...'; खादाड नवरीबाईचा मजेशीर VIDEO

'आधी मॅगी मग लग्न, नवरदेवाला सांगा...'; खादाड नवरीबाईचा मजेशीर VIDEO

व्हायरल व्हिडिओ लग्नाच्या दिवशीचा आहे. मेकअप करणारा व्यक्ती नवरीचे केस व्यवस्थित करत आहे, तर नवरीबाईच्या हातात मॅगीची प्लेट आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : लग्न (Marriage) हे अतिशय पवित्र मानलं जातं. लोक आपल्या लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. लग्नाच्या बरंच आधीपासूनच घरामध्ये तयारी सुरू होते. मात्र, अनेकदा नवरदेव नवरी लग्नमंडपातच असं काही करतात जे पाहून सर्वांनाच हसू येतं. अशाच एका नवरीबाईचा मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Bride) सध्या सोशल मीडियावर (Wedding Video on Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. काकूबाई जोमात! ‘बाला ओ बाला’ गाण्यावर मजेशीर डान्स; स्टेप्स पाहून खळखळून हसाल व्हायरल व्हिडिओ लग्नाच्या दिवशीचा आहे. व्हिडिओमध्ये नवरीबाई मेकअप करून बसलेली दिसते. मेकअप करणारा व्यक्ती नवरीचे केस व्यवस्थित करत आहे, तर नवरीबाईच्या हातात मॅगीची प्लेट आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी महिला नवरीला विचारते की काय लागलं आहे? यावर नवरी उत्तर देत म्हणते भूक. नंतर तिने नूडल्स खात म्हटलं की नवरदेव वाट बघेल. पुढे नवरीला विचारलं जातं, की नवरदेवाला किती वेळ वाट पाहायला लावशील? यावर ती उत्तर देते, एखादा तास...किंवा दोन तासही होऊ शकतात.
  नवरीचा हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर mua_mis_tanuarora नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत यूजरनं लिहिलं, यात मॅगी लव्हरला टॅग करा. नवरीबाईचा मॅगी खातानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीही हा व्हिडिओ पाहून खळखळून हसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.50 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. दिमाखात स्टंट करायला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भलतंच; झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO इन्स्टाग्राम यूजर्सची या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. नवरीबाईला खाण्याची किती आवड आहे आणि खाण्याशिवाय तिला सध्या दुसरं काहीच दिसत नाही, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी आपल्या कुटुंबातीला सदस्यांना, मित्रांना किंवा इतर जवळच्या लोकांना टॅग केलं आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत आपणही मॅगी लव्हर असल्याचं सांगितलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: