मराठी बातम्या /बातम्या /Viral /Oh no! स्टेजवरच नवरदेवानं केलेल्या त्या कृत्यामुळे नवरीचा हिरमोड; VIDEO होतोय व्हायरल

Oh no! स्टेजवरच नवरदेवानं केलेल्या त्या कृत्यामुळे नवरीचा हिरमोड; VIDEO होतोय व्हायरल

संगीत समारंभात एक कपल डान्स करत आहे. मात्र, याचदरम्यान झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे नवरी आणि नवरदेव यांचा हिरमूड झाला

संगीत समारंभात एक कपल डान्स करत आहे. मात्र, याचदरम्यान झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे नवरी आणि नवरदेव यांचा हिरमूड झाला

संगीत समारंभात एक कपल डान्स करत आहे. मात्र, याचदरम्यान झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे नवरी आणि नवरदेव यांचा हिरमूड झाला

नवी दिल्ली 29 जुलै : लग्नसमारंभात नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) यांच्यावरच सर्वांचं लक्ष असतं. दोघंही आपल्या निराळ्या अंदाजामुळे लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. आपला आनंद ते पाहुणे, कुटुंबीय आणि मित्रांच्या समोर गाणं आणि डान्समधून व्यक्त करतात. मात्र, यादरम्यान अनेकदा असं काही घडतं, जे पाहून सगळीकडे हशा पिकतो. लग्नसमारंभातील असे मजेशीर व्हिडिओ (Wedding Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत असतात आणि याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंतीदेखील मिळते.

..अन् भल्यामोठ्या अजगरानं अख्खं मांजर गिळलं; पाहा मन सुन्न करणारा VIDEO

सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पाहायला मिळतं, की संगीत समारंभात एक कपल डान्स करत आहे. मॅचिंग ड्रेसमध्ये हे दोघंही अतिशय सुंदर अंदाजात बॉलिवूड सॉन्गवर डान्स करत आहेत. मात्र, याचदरम्यान झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे नवरी आणि नवरदेव यांचा हिरमोड झाला.

78 वर्षीय आजीच्या भन्नाट डान्सचा इंटरनेटवर धुमाकूळ; VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

नवरदेव डान्स करतानाच नवरीला आपल्या खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र नवरीला उचलताच तो स्टेजरवरच खाली कोसळतो. यानंतर जेव्हा नवरदेव पुन्हा उभा राहतो तेव्हा आपला हात दाखवत असा इशारा करतो की त्याला काही दुखापत झाली नाही. मात्र, नवरीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच या घटनेनंतर तिला लाज वाटल्याचं जाणवतं. नवरी आणि नवरदेवाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Dance video, Video viral