नवी दिल्ली, 16 डिसेंबर: एका कुत्रा (Dog) अत्यंत सराईतपणे स्केटिंग करत (Skating) असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियात जोरदार (Viral on social media) व्हायरल होत आहे. स्केटिग हे तर शिकून येणारं स्किल (Skill) आहे. सराईतपणे स्केटिंग करण्यापूर्वी ते शिकावं लागतं. अनेकदा पडल्यानंतर आणि अनुभव घेतल्यानंतर हळूहळू स्केटिंग करता येतं. मात्र माणसांप्रमाणेच प्राणीदेखील स्केटिंग करू शकतात आणि कदाचित माणसापेक्षाही अधिक उत्तम प्रकारे बर्फावरून घसरू शकतात, हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसून आलं आहे.
दुनिया ज़माने की फिक्र छोड़ो, जिस चीज़ में मन लगे उसमें ऐसे रम जाओ कि एक दिन यही ज़माना आपको देख चकित हो जाये.
सुप्रभात. pic.twitter.com/AVOgQpS3si — Dipanshu Kabra (@ipskabra) December 16, 2021
कुत्रा करतो स्केटिंग
या व्हिडिओत सुरुवातीला कुत्रा कॅमेराकडे पाहतो आणि स्केटिंगसाठी बर्फाच्या दिशेनं जातो. तिथं ठेवलेल्या स्केटिंग बोर्डवर उभा राहतो आणि पाहता पाहता बर्फावरून घसरत निघून जातो. कुत्रा ज्या सराईतपणे बर्फावरून घसरतो, ते पाहून त्याला स्केटिंगचं व्यवस्थित प्रशिक्षण मिळावं असावं, असंच वाटत राहतं. पाहता पाहता कुत्रा स्केटिंग बोर्डवरून एखाद्या प्रोफेशनल स्केटरप्रमाणं घसरत जाताना आपल्याला दिसतं.
45 सेकंदांचं स्केटिंग
या बर्फातून कुत्रा घसरत जातो आणि उतार संपताच पुन्हा स्केटिंग बोर्ड आपल्या तोंडात पकडून तो वर आणताना दिसतो. कुत्राची ही स्टाईल पाहून अनेकजण खूश झाले आहेत. केवळ दाखवण्यासाठी किंवा मालकाच्या आज्ञेवरून अनेक प्राणी अशा कलाकृती करून दाखवत असतात. मात्र हा कुत्रा आपल्या स्वतःच्या आनंदासाठीदेखील हे करत असल्याचं दिसतं. स्केटिंगचा हा प्रकार कुत्रा फुल्ल टू एंजॉय करताना दिसतो आणि हा व्हिडिओ पाहून चाहते भलतेच खूश होतात.
हे वाचा- जगातली सर्वात महाग Food Delivery! अंतरिक्षात जेवण घेऊन पोहोचला कोट्यधीश
इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्केटिंग करणारा हा कुत्रा अनेकांना आवडला आहे. IPS दिबांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यासोबत एक संदेशदेखील लिहिला आहे. जगाची काळजी सोडा. आपलं मन ज्यात रमेल, ते करा. मग जगच तुमच्याकडे आश्चर्यचकित होऊ पाहत राहिल, असा संदेश त्यात देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Dog, Video viral