मुंबई, 10 ऑक्टोबर : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओज सतत व्हायरल (Video of cow drinking water from tap goes viral) होतच असतात. कधी प्राण्यांनी उपद्रव दिल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी त्यांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचे. एका गायीच्या समजूतदारपणाचा (Smart cow closes tap after drinking water) आणि स्मार्टनेसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
गायीला लागली तहान
या व्हिडिओतील गायीला तहान लागली असून ती पाण्याचा शोध घेते आहे. तिला एका नळ दिसतो. मग गाय त्या नळाजवळ येते. आपल्या शिंगांने नळ सुरू करते आणि नळाचं पाणी पिते, असं या व्हिडिओत दिसतं. खरी गंमत तर त्यापुढे आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर एखाद्या जबाबदार नागरिकाप्रमाणे गाय नळ बंद करते. आपल्या शिंगाने जसा तिनं नळ सुरू केला, तसाच ती तो बंद करते. गायीच्या या स्मार्टनेसचं सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. गायीलाही पाण्याचं महत्त्व कळालं असून ते वाया जाऊ न देण्याची समज तिच्याकडे असल्याची चर्चा सोशल मीडियात जोरदार रंगली आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
सोशल मीडियात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यावर आलेल्या नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही मजेशीर आहेत. गाय खरोखरच स्मार्ट आहे, असं एका युजरनं म्हटलं आहे. तर गायीलाही पाण्याचं मोल समजलं आहे, असं दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे. याशिवाय इतरही अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science, Viral videos