• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ही एक्सप्रेस नाही मालगाडीच! 100km ताशी वेगानं धावणाऱ्या कंटेनर ट्रेनचा VIDEO पाहाच

ही एक्सप्रेस नाही मालगाडीच! 100km ताशी वेगानं धावणाऱ्या कंटेनर ट्रेनचा VIDEO पाहाच

काय सांगता मालगाडी 100km ताशी वेगानं धावली? विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO.

 • Share this:
  बंगळुरू, 12 नोव्हेंबर : भारतीय रेल्वे कधीच वेळेवर येत नाही, अशी तक्रार कायम केली जाते. मात्र भारताचे रेल्वे नेटवर्क जगात सर्वात मोठं आहे. भारताचा रेल्वे मार्ग 1.23.236 किमी लांबपर्यंत पसरला आहे. देशात 9146 मालगाड्या चालतात. रोज 3 मिलियन टन सामान 7349 स्टेशनपर्यंत पोहचवलं जातं. एका मालगाडीचा साधारण स्पीड हा 24 किमी ताशी असतो. मात्र नुकत्याच एका मालगाडीनं एक रेकॉर्ड केला. 1800 टन माल घेऊन एका मालगाडी 100km ताशी वेगानं धावली. या मालगाडीचा व्हिडीओ रेल्वेनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकं ही नक्की मालगाडी आहे की एक्सप्रेस असा प्रश्न विचारत आहेत. वाचा-दैव बलवत्तर! अंधारात ट्रॅकवर फिरत होते हत्ती, मागून सुसाट ट्रेन आली पण... वाचा-डेअरी प्लांटमध्ये दुधाने भरलेल्या टबमध्ये मजेत अंघोळ करताना केला VIDEO डीआरएस बंगळुरूनं हा व्हिडीओ शेअर केला असून, "नाही ही एक्सप्रेस ट्रेन नाही आहे", असे कॅप्शन दिले आहे. तसेच, ही एक फ्रेट ट्रेन असून जी BSM-VRDP स्थानकादरम्यान 100 किमी प्रतितास वेगानं धावत आहे. मुख्य म्हणजे या मालगाडीत 1800 टन सामना आहे. या मालगाडीनं 120 किमीचा प्रवास 2 तास पूर्ण केला. वाचा-फटाके फोडण्याचा आनंद लुटण्यासाठी अजब जुगाड, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का या मालगाडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी रेल्वेचे कौतुक केले आहे. रेल्वे मार्ग हा भारताचा अविभाज्य भाग असून मालगाड्या दररोज लाखो टन माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहचवत असतात.
  Published by:Priyanka Gawde
  First published: