मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अद्भुत VIDEO! एका कारवर पार्क केली दुसरी कार, एकाही ओरखड्याविना केली कमाल

अद्भुत VIDEO! एका कारवर पार्क केली दुसरी कार, एकाही ओरखड्याविना केली कमाल

एक कार दुसऱ्या कारवर चढून पार्क केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

एक कार दुसऱ्या कारवर चढून पार्क केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

एक कार दुसऱ्या कारवर चढून पार्क केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 24 डिसेंबर: एका कारवर दुसरी कार (One car on another) पार्क करण्याची (Car parking) किमया दाखवणारा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल नेटवर्कवर जोरदार व्हायरल होत आहे. काही व्हिडिओ हे त्यातील प्रत्यक्ष कृतीमुळे व्हायरल होत असतात, तर काही व्हिडिओ हे तांत्रिकदृष्ट्या हुशारीने शूट करण्यात आलेले असतात. वेगवेगळ्या अंतरावरून दिसणाऱ्या वस्तूंच्या आकारमान आणि रुपाचा फायदा घेत अत्यंत हुशारीनं हे व्हिडिओ तयार करण्यात येतात. यात व्हिडिओच्या सुरुवातीला जी परिस्थिती दिसते, तो मुळात एक आभास असल्याचं व्हिडिओच्या शेवटी लक्षात येतं आणि तंत्रज्ञानाची गंमत वापरून कसा उत्तम व्हिडिओ बनवता येऊ शकतो, हेदेखील त्यातून दिसून येतं. व्हिडिओच्या सुरुवातीला दोन कार दिसतात. त्यापैकी एक कार रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेली आहे, तर दुसरी कार पार्क करण्यात येत आहे. कार पार्किंग करत असताना कारचा चालक गाडी मागे घेत असल्याचं दिसतं. मागे उभ्या असलेल्या कारच्या ती कार इतकी जवळ येते की आता त्यांची धडक होईल, असं वाटून एकजण ओरडतानाही व्हिडिओत ऐकू येतं. मात्र त्या आवाजाला न जुमानता कार मागे जाते आणि पाठिमागच्या कारच्या थेट छतावर चढते. एका कारवर दुसरी कार व्हिडिओत एका कारवर दुसरी कार चढत असल्याचं दिसतं. सुरुवातीला हा प्रकार पाहून धक्का बसतो आणि कॅमेरा जसजसा कारच्या जवळ जातो, तसतशी परिस्थिती लक्षात येते. सुरुवातीला पार्क केलेली जी कार खरी आहे, असं वाटतं ती तशी नसल्याचं लक्षात येतं. ती एक कारची थ्रीडी आकृती असून कॅमेरा अँगलमुळे त्याचा आभास झाल्याचं लक्षात येतं. हे वाचा - धक्कादायक! पेट्रोलमध्ये थेट पाण्याचीच भेसळ, पेट्रोलपंपाचं गैरकृत्य अखेर उघड व्हिडिओ होतोय व्हायरल हा व्हिडिओ रस्त्याच्या एका कडेला शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत असून तो विविध माध्यमातून शेअर करण्यात येत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Car, Viral video.

    पुढील बातम्या