नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : सोशल मीडियावर प्राणी तसंच पक्षांचे अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ अतिशय मनोरंजक असतात. माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही अनेकदा आपल्या डोक्याचा वापर करून काहीतरी वेगळंच करून दाखवतात. अशा प्राणी आणि पक्षांचे व्हिडिओ इंटरनेटवर चांगलेच व्हायरल (Video Viral on Social Media) होतात. शिकारीसाठीही प्रत्येक प्राणी आपली एक वेगळी कला वापरत असतो. सध्या अशाच एका पक्षाचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा सागरी बगळा म्हणजेच हेरॉन पक्षी पाहायला मिळतो. हा पक्षी पाण्यातील माशांना पकडण्यासाठी (Black Heron Hunts Fish) जी कला वापरतो ती लक्ष वेधणारी आहे. पाण्याच जाताच हा पक्षी आपले छत्रीसारखे पंख गोलाकार करून पूर्णपणे मिटून घेतो. यामुळे त्याच्या खाली संपूर्ण अंधार होतो. यानंतर मासे आकर्षित होऊन त्याठिकाणी येतात आणि मासे दिसतात हा पक्षी त्यांची शिकार करतो. आपल्या उपजीविकेसाठी हा पक्षी अतिशय हुशारीने मासे पकडतो. अशा पद्धतीच्या शिकारीला कॅनोपी फिडिंग असं म्हटलं जातं.
Who & how they were taught this survival skill??
Black heron hunts with a method, commonly known as canopy feeding, using its wings like an umbrella to create shade that attracts fish. Amazing. Via Massimo. 🎬: @leedsbirder pic.twitter.com/GzEiK3Yi3F — Susanta Nanda IFS (@susantananda3) November 21, 2021
हेरॉन पक्षाचा हा मनमोहक व्हिडिओ आयएफएस सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की या पक्षांना ही कला कोण आणि कसं शिकवतं? हा अनोखा व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 25 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की आतापर्यंत पाहिलेला हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आपण हे मानायला पाहिजे की पृथ्वीवर मनुष्य हाच सर्वात हुशार नसून काही प्राणी आणि पक्षी यांच्याकडील बऱ्याच कला शिकण्यासारख्या असतात. याशिवायही इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.