मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हत्तीनं केली कमाल, सहज पार केलं उंचावरचं कुंपण; पाहा धमाल VIDEO

हत्तीनं केली कमाल, सहज पार केलं उंचावरचं कुंपण; पाहा धमाल VIDEO

एका हत्ती त्याच्यापेक्षा उंच असलेल्या (Video of an elephant crossing a fence goes viral) कुंपणावरून चढून पलीकडे गेल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

एका हत्ती त्याच्यापेक्षा उंच असलेल्या (Video of an elephant crossing a fence goes viral) कुंपणावरून चढून पलीकडे गेल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. साधारणतः हत्तींचे व्हिडिओ (Various videos of elephant) हे भांडणाचे, काहीतरी मोडतोड किंवा नासधूस केल्याचे असतात. त्याशिवाय पाण्यात डुंबणारे, मस्ती करणारे, सोंडेतून एकमेकांवर पाणी उडणवणारेही व्हिडिओ असतात. थोडक्यात संतापलेला हत्ती आणि आनंदी हत्ती (Angry elephant and Happy elephant) ही हत्तीची दोन रुपं आपल्याला नेहमीच दिसत असतात. मात्र या व्हिडिओत दिसणारं हत्तीचं रुप वेगळंच आहे. यात हत्ती चक्क एक स्टंट करताना दिसतो.

हे वाचा-46 व्या वर्षी 'डिंपल गर्ल' बनली आई! प्रीति झिंटाने दिली GOOD NEWS

काय आहे व्हिडिओत?

नदीकाठी लावलेलं एक कुंपणवजा गेट पार करून हत्ती जात असल्याचं या व्हिडिओत दिसतं. नदीच्या काठावर हे कुंपण उभारलं आहे. ते हत्तीपेक्षाही अधिक उंचीवर आहे. हत्ती सुरुवातीला आपले पुढचे दोन पाय त्याच्यावर ठेवतो. मग आपलं शरीर उचलून घेतो आणि पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यात स्वतःचंच वजन सहन न झाल्यामुळे हत्ती पडेल की काय, अशी शंका येऊ लागते. मात्र अत्यंत सराईतपणे हत्ती आपले पाय पुढे टेकवतो आणि त्यांच्या आधार बनवत गेटवरून खाली उतरतो.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हत्तींचा स्वभाव लक्षात घेता, ते कधी असले स्टंट करताना दिसत नाहीत. हत्ती त्याच्या वाटेत येणारी आणि त्याला अडथळा वाटणारी गोष्ट सरळ उखडून किंवा धक्का देऊन पाडून टाकतो आणि मगच पुढे जातो. या व्हिडिओत मात्र हत्ती कुंपणावर चढून पलिकडे जाताना दिसत असल्यामुळे अनेकांना त्यात वेगळेपण वाटत आहे. 27 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून युजर्सच्या पसंतीस उतरत आहे. अनेक हत्तीप्रेमींनी हा व्हिडिओ पाहिला असून ते एकमेकांना फॉरवर्ड करत आहेत.

First published:

Tags: Elephant, Viral video.