• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • महिलेनं भर रस्त्यात उगारलं चप्पल, सर्वांदेखत केली तरुणाची धुलाई, पाहा Viral Video

महिलेनं भर रस्त्यात उगारलं चप्पल, सर्वांदेखत केली तरुणाची धुलाई, पाहा Viral Video

तिघांच्या वादात पडलेल्या महिलेनं (woman) पायातील चप्पल (shoe) काढून तरुणावर हल्लाबोल केल्याचा व्हिडिओ (video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  लखनऊ, 22 ऑगस्ट : सध्या इंटरनेटवर (Internet) कुठला व्हिडिओ व्हायरल (Viral video) होईल, याचा काही भरवसा नाही. एखादी घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद होते आणि बघता बघता ती व्हायरल होते. तिघांच्या वादात पडलेल्या महिलेनं (woman) पायातील चप्पल (shoe) काढून तरुणावर हल्लाबोल केल्याचा व्हिडिओ (video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच लखनऊच्या प्रियदर्शिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या चप्पलधारी महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलीस आणि दोन तरुणांच्या वादात या महिलेनं एन्ट्री केली आणि काही सेकंदातच पायातली चप्पल हातात घेतली. रागाचा पारा चढलेल्या या महिलेचा तोरा पाहून तरुणही मागे हटले. नेमकं काय घडलं? हा व्हिडिओ लखनऊमधील एका चौकात चित्रित झाला आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या दृश्यांनुसार एक टेम्पोचालक पोलिसांकडे तक्रार करताना दिसत आहे. तो टेम्पोतून उतरून पोलिसांकडे जातो आणि दोन तरुणांबाबत त्यांच्याकडे तक्रार करताना दिसतो. टेम्पोच्या भाड्यावरून हा वाद सुरू असल्याचं दिसतं. ठरलेलं भाडं देत नसल्याची तक्रार टेम्पोचालकाची असते, तर इतर दोन तरुण भाड्याबाबत स्वतःची भूमिका मांडताना दिसतात. तेवढ्यात एक महिला व्हिडिओमध्ये आल्याचं दिसतं. सुरुवातीच्या काही सेंकंदातच ही महिला पायातून चप्पल काढते आणि तरुणावर हल्लाबोल करते. त्यानंतर तरूण मागे हटतो आणि हा व्हिडिओ संपतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या भांडणात प्रवेश कऱणाऱ्या आणि काही संकेदातच स्वतःची चप्पल हातात घेऊन तरुणांवर वार करणाऱ्या या महिलेबाबत उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे.
  Published by:desk news
  First published: