मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भीषण अपघाताचा VIDEO! पोलीस इन्स्पेक्टरच्या कारने दोन तरुणींना चिरडलं, एकीचा जागीच मृत्यू

भीषण अपघाताचा VIDEO! पोलीस इन्स्पेक्टरच्या कारने दोन तरुणींना चिरडलं, एकीचा जागीच मृत्यू

या दोन्ही तरुणी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या आणि रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होत्या

या दोन्ही तरुणी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या आणि रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होत्या

या दोन्ही तरुणी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या आणि रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होत्या

  • Published by:  Meenal Gangurde

चंडीगड, 18 ऑक्टोबर : पंजाबमधील जालंधर-फगवाडा हायवेवरील (Jalandhar-Phagwara highway) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. येथील धानेवाली गावाजवळ एका पोलीस इन्स्पेक्टरने (police inspector) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन तरुणींना चिरडलं. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू (Girl death on the spot) झाला असून दुसरी गंभीर जखमी आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ही गाडी होशियारपूरची असल्याचं सांगितलं जात आहे. गाडी पंजाब पोलिसातील इन्स्पेक्टर अमृत पाल सिंग चालवित होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी हायवेवर चक्का जाम केला आहे. त्यामुळे दोन्हीकडील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. (VIDEO of a terrible accident Two young women were crushed by a police inspectors car one died on the spot)

हे ही वाचा-चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला; भीषण अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होत्या. तितक्यात भरधाव वेगाने एक कार त्यांच्या दिशेला येताना पाहून त्या मागेही सरकल्या.

" isDesktop="true" id="619684" >

मात्र गाडी इतकी वेगात होती की, गाडीने त्यांना चिरडलं आणि डिव्हायडरजवळील पत्राही उडाला. या भीषण अपघातात नवजोत कौर नावाच्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर तिची मैत्रिण गंभीर जखमी आहे व तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघी एका लोकल शोरूममध्ये काम करीत होत्या.

First published:

Tags: Punjab, Road accident