Home /News /viral /

माकडानं मोठ्या मजेत खाल्ला हलवा, कसब बघून लोक म्हणाले – How Cute!

माकडानं मोठ्या मजेत खाल्ला हलवा, कसब बघून लोक म्हणाले – How Cute!

माकड हे माणसासारखं सभ्यपणे, बाऊल आणि चमचा घेऊन काही खाऊ लागलं, तर तुम्हाला काय वाटेल? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

  नवी दिल्ली, 16 डिसेंबर: एका माकड (Monkey) सराईतपणे बाऊल आणि चमचा (Bowl and Spoon) घेऊन हलवा (Sweets) खात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार (Viral Video) व्हायरल होत आहे. प्राणी पाळण्याचा छंद अनेकांना असतो. पाळीव प्राण्यांमध्ये जशी सर्वाधिक पसंती कुत्रा आणि मांजरांना असते, त्याखोलाखाल माकडांवरदेखील अनेकजण निस्मिम प्रेम करताना दिसतात. आपल्या पाळीव प्राण्यांच्या वेगवेगळ्या कृती रेकॉर्ड करून त्या सोशल मीडियावर अपलोड करणं, हा अनेकांचा छंद असतो. अशाच एका हौशी मालकानं त्यानं पाळलेल्या माकडाचा एक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत माकडाला खाण्यासाठी हलवा देण्यात आला असून ते मोठ्या मजेनं हा हलवा खात असल्याचं दिसतं.
  View this post on Instagram

  A post shared by @monkey.lovable

  प्रेक्षक झाले थक्क चमच्याने पदार्थ कसे खावेत, याचं मान माणसांनादेखील नीटसं आलेलं नसतं. मात्र माकड असूनही अतिशय हुशारीनं आणि सराईतपणे ते चमच्याचा वापर करून हलवा खाताना दिसतं. माकड आपल्याच धुंदीत आहे आणि हलवा खाण्याचा ते मनापासून आनंद लुटत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. माकडाची अनोखी स्टाईल व्हिडिओत दिसणाऱ्या या माकडानं अंगात टीशर्ट घातला असून नीट आवरून सावरून ते हलवा खायला बसल्याचं हा व्हिडिओ पाहून लक्षात येतं. हलवा खाताना चमचा कसा पकडावा, हे लहान मुलांनादेखील शिकवावं लागतं. सुरुवातीला मुलांनाही चमचा कसा पकडावा, ते समजत नाही. मात्र माकड जणू काही अनेक वर्षांचा सराव असल्याप्रमाणे चमच्याने हलवा खात राहतं. हे वाचा- बॉसला जाहीरपणे दिल्या शिव्या, तरीही मिळाली लाखोंची नुकसानभरपाई; वाचा सविस्तर लोकांनी केलं कौतुक सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. Monkey.lovable या इन्ट्राग्राम अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 80 हजारपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना ते हा व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Food, Video viral

  पुढील बातम्या