भुकेनं व्याकूळ झालेल्या हत्तीनं खाल्लं हेल्मेट; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

भुकेनं व्याकूळ झालेल्या हत्तीनं खाल्लं हेल्मेट; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ (Elephant Video) व्हायरल होत आहे. हा हत्ती भूक लागल्यावर गवत किंवा फळं नाही तर हेल्मेट खात असल्याचं पाहायला मिळत आहे

  • Share this:

नवी दिल्ली 11 जून: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्याचे थक्क करणारे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. हत्ती तर जंगलाची शान मानले जातात. अनेकदा जंगलांमध्ये हत्ती गटानं एकत्र फिरताना दिसतात. हत्ती दिसायला जितका मोठा असतो, तितकाच मोठा आहारही त्याला लागतो. त्यामुळे, जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो एखादं मोठं झाडंही मुळापासून उखडतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ (Elephant Video) व्हायरल होत आहे. हा हत्ती भूक लागल्यावर गवत किंवा फळं नाही तर हेल्मेट खात असल्याचं पाहायला मिळत आहे. हत्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक हत्ती रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या गाडीवरील हेल्मेट आपल्या सोंडेच्या मदतीनं खाली घेतो आणि यालाच आपलं भोजन समजून खाऊन घेतो. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा (Indian Forest Service)अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं, कृपया कोणीतरी या भुकेल्या प्राण्याला सांगा, की हेल्मेट घातल्यानं जीव वाचतो, ते खाल्ल्यानं नाही.

अरे बापरे! संसदेतच रंगला कुस्ती आखाडा, खासदारांच्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. हत्तीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, की हेल्मेट खाणं त्यासाठी घातक ठरू शकतं. याचं उत्तर देत प्रवीण अंगुसामी यांनी लिहिलं, की हे हेल्मेट त्यानं उलटी करून बाहेर काढलं असणार, कारण ही एखादी लहान वस्तू नाही. मात्र, यानंतरही अनेक युजर्सनं हत्तीसाठी चिंता व्यक्त केली आहे.

रेल्वे ट्रॅकवर करत होता बाईक स्टंट, अचानक आली ट्रेन आणि...; पाहा थरारक VIDEO

या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की रस्त्याच्या कडेला एक दुचाकी उभा आहे. या गाडीच्या हॅण्डलला एक हेल्मेट अडकवलेलं आहे. अचानक तिथे एक हत्ती येतो आणि आपल्या सोंडेच्या सहाय्यानं हे हेल्मेट खाली घेतो. हत्तीला पाहून असं वाटतं, की त्याला खूप भूक लागली आहे मात्र खाण्यासाठी काहीही मिळालेलं नाही. यामुळे तो हे हेल्मेट गाडीवर खाली घेत आपल्या सोंडेत पकडतो आणि खातो आणि यानंतर हत्ती तिथून निघून जातो.

Published by: Kiran Pharate
First published: June 11, 2021, 11:08 AM IST

ताज्या बातम्या