Home /News /viral /

OMG! हे कसं शक्य आहे? एकसोबतच दोन्ही हाताने लिहिते ही चिमुकली; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

OMG! हे कसं शक्य आहे? एकसोबतच दोन्ही हाताने लिहिते ही चिमुकली; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

व्हिडिओमध्ये एक मुलगी दोन्ही हातांनी लिहिताना दिसत आहे (Girl Writes With Both Hands). व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सचाही विश्वास बसत नाही की कोणी इतकं टॅलेन्टेड कसं असू शकतं.

    नवी दिल्ली 13 एप्रिल : जगात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक मुलगी दोन्ही हातांनी लिहिताना दिसत आहे (Girl Writes With Both Hands). व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सचाही विश्वास बसत नाही की कोणी इतकं टॅलेन्टेड कसं असू शकतं. खाद्य देण्यासाठी गेलेल्या तरुणीचा हात जबड्यात पकडून मगरीने पाण्यात खेचलं, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी दोन्ही हातात खडू घेऊन ब्लॅक बोर्डवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. ती एकाच वेळी दोन्ही हातांच्या मदतीने प्रचंड वेगाने लिहिताना दिसते. व्हिडिओच्या कॅप्शननुसार आदि स्वरूपा असं या मुलीचं नाव आहे. ती भारतीय असून या मुलीच्या नावे विश्वविक्रमही आहे. ती आपल्या दोन्ही हातांनी हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये लिहू शकते. Erik Solheim नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'खूप छान! एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहू शकणार्‍या भारतातील आदि स्वरूपाला भेटा! ती एक विश्वविक्रम धारक आहे, जी कन्नड, इंग्रजी, हिंदी, मल्ल्याळम अशा विविध भाषांमध्ये 10 अद्वितीय मार्गांनी लिहू शकते. मालकिणीसोबत इंग्लिशमध्ये गप्पा मारताना दिसला पोपट; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक या मुलीचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. मुलीचं टॅलेन्ट पाहून बहुतेकांना धक्का बसला आहे. व्हिडिओ पाहून काही लोक म्हणत आहेत की, या मुलीनं देशाची मान अभिमानाने उंचवली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Video Viral On Social Media

    पुढील बातम्या