मराठी बातम्या /बातम्या /Viral /आलं अंगावर घेतलं शिंगावर! म्हशीच्या वाकड्या शिंगात असा अडकला कुत्रा की.... पाहा Viral Video

आलं अंगावर घेतलं शिंगावर! म्हशीच्या वाकड्या शिंगात असा अडकला कुत्रा की.... पाहा Viral Video

या कुत्र्याला सोडवताना ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली. पाहा हा सोशल मीडियावर viral झालेला video

या कुत्र्याला सोडवताना ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली. पाहा हा सोशल मीडियावर viral झालेला video

या कुत्र्याला सोडवताना ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली. पाहा हा सोशल मीडियावर viral झालेला video

जयपूर, 24 जून : कधी कधी मुके प्राणी अशा काही संकटात अडकतात, की त्यातून त्यांना स्वतःची सुटका करून घेणंही शक्य होत नाही. राजस्थानमधील (Rajasthan) एका गावात असंच घडलं. एक कुत्रा (dog video) एका म्हशीच्या शिंगात (dog in buffalo horns viral video) अडकला आणि त्याला स्वतःची सुटका करून घेता येईना. या गावातील काहीजणांनी (Rajasthan viral video) या घटनेचं चित्रिकरण करून सोशल मिडियावर (social media) टाकलं. हा व्हिडिओ सध्या देशभरात व्हायरल (viral video) होत आहे. जयपूरच्या कोटा परिसरातल्या कुठल्याशा गावातील ही घटना असावी, असं सांगितलं जात आहे.

असा अडकला कुत्रा

राजस्थानमधील अनेक म्हशींची शिंगं मोठी असतात. ही शिंगच एका म्हैशीसाठी मोठी डोकेदुखी ठरली. आता हा कुत्रा नेमका कसा शिंगात अडकला, याची कुठलीही माहिती उपलब्ध नसली तरी कुत्रा या शिंगांमध्ये पूर्णतः अडकलेला असून जीवाच्या आकांताने त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. तर म्हैसदेखील या प्रकारानं हादरली असून आपल्या डोक्यावरचं हे नसतं ओझं कसं उतरवता येईल, यासाठी जंग जंग पछाडत असल्याचं व्हिडिओत दिसतं. " isDesktop="true" id="569810" >

कधी कुत्रा बुजायचा तर कधी म्हैस

या दोन मुक्या प्राण्यांना स्वतःहून या संकटातून मार्ग काढता येत नसल्याचं स्पष्ट झाल्यावर तिथल्या ग्रामस्थांनी त्यांची एकमेकांपासून सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला त्यांनी कुत्र्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शिंगातून ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नाला काही यश आलं नाही. तो कुत्रा इतक्या विचित्र पद्धतीनं शिंगात अडकला होता की सर्व प्रयत्न करूनही त्याची सुटका होत नव्हती. या सगळ्यात कधी कुत्रा बुजायचा तर कधी म्हैस. ग्रामस्थांनी या दोघांनाही पकडून ठेवलं होतं, मात्र एका क्षणी म्हैस इतकी वैतागली की ग्रामस्थांच्या तावडीतून सुटून तिथं थेट पळ काढला. मात्र तरीही शिंगात कुत्रा अडकलेलाच होता.

हे वाचा - 4 वर्षांच्या मुलीनं मागवलं ऑनलाईन फूड; बिल बघून पालकांना बसला शॉक

हार मानतील ते ग्रामस्थ कसले?

ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त सुरूच ठेवली. पुन्हा कुत्र्याला घेऊन धावणाऱ्या म्हैशीला गाठलं आणि यावेळी कुत्र्याच्या अंगावर एक पोतं टाकून त्याला पुन्हा एकदा बाहेर ओढलं. यावेळी मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि कुत्र्याची शिंगांमधून सुटका झाली. हा प्रकार बघण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.

First published:

Tags: Rajasthan, Video viral