नवी दिल्ली, 21 मार्च : नवी दिल्लीतील रोहिणी येथे दोन महिलांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार आणि 'मजनू का टीला' या भागात नेपाळी महिलेची गोळी मारून हत्या करण्याच्या प्रकरणात समीर आणि फैजल नावाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. नेपाळी महिलेची देखील लूटमार करण्याच्या हेतूने हत्या करण्यात आली आहे. (accused Wife fights with police to save husband )
या प्रकरणात आरोपींची बाइक ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. साध्या कपड्यात पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. तेथे मात्र आरोपीची पत्नी त्याला वाचविण्यासाठी पुढे आली आणि तिने थेट पोलिसांशीच पंगा घेतला.
दिल्लीतील गीता कॉलनीतून या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेतल्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी तब्बल 25 हून अधिक रॉबरी आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. (accused Wife fights with police to save husband ) जेव्हा पोलिसांची टीम आरोपीला पकडण्यासाठी गीता कॉलनीत पोहोचली तेव्हा आरोपींनी भररस्त्यात राडा घातला. पोलिसांनी फैजानला पकडण्यासाठी हवेत राऊंड फायरिंग केली.
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी रचला सापळा; भररस्त्यात आरोपीच्या पत्नीने पोलिसांशी घेतला पंगा. नवी दिल्लीतील घटना... pic.twitter.com/OMlzW8esDd
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.