Home /News /viral /

VIDEO : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! महिलेने दिला बाळाला जन्म; कचराकुंडीत पडल्यामुळे मृत्यू

VIDEO : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! महिलेने दिला बाळाला जन्म; कचराकुंडीत पडल्यामुळे मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा नर्स हसत होती, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

    पानीपत, 11 ऑक्टोबर : हरियाणातील (Haryana News) पानीपत (Panipat) जिल्ह्यात सर्वसामान्य रुग्णालयातून अत्यंत निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका गर्भवती महिलेने  (Pregnant Woman) बाळाला जन्म दिला तर बाळ कचरा कुंडीत (Dustbin) पडलं आणि नर्स हा प्रकार पाहून हसत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेनंतर तातडीने महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. आणि बाळाला उपचारासाठी दुसरीकडे रेफर करण्यात आलं. मात्र दुसऱ्या रुग्णालयात गेल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. अग्रवाल मंडी निवासी ज्योती नावाची ही गर्भवती महिला गर्भकळा सुरू झाल्यानंतर पानीपत येथील सिव्हील रुग्णालयातील लेबर वॉर्डमध्ये भरती झाली होती. (VIDEO Hospital negligence The woman gave birth to a baby Death by falling into the dustbin) हे ही वाचा-आई-वडिलांपासून लपवून मुलगी करायची हे काम; सत्य समोर येताच हादरले कुटुंबीय दुपारी साधारण अडीचच्या दरम्यान महिलेला जेव्हा वेदना सुरू झाल्या तेव्हा गर्भवतीने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांभाळण्यास सांगितलं. मात्र ते कर्मचारी आपआपसाद गप्पा मारण्यात व्यग्र होते. कोणी कर्मचारी मोबाइलवर होते. त्यादरम्यान महिलेने एका बाळाला जन्म दिला. आणि बाळ शेजारी असलेल्या डस्टबीनमध्ये पडला. ज्यानंतर बाळाचा चेहरा निळा पडला होता. यामुळे महिले पुरती घाबरली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा तेथील नर्स उभी राहून हसत असल्याचा आरोपी पीडित महिलेने केला आहे. या सर्व प्रकारासाठी रुग्णालयाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोपी महिलेने केला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मला बाळ गमावावा लागल्याचं महिलेचं म्हणणं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Pregnancy, Video viral

    पुढील बातम्या