पित्यानं मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकले टेडी बिअरमध्ये, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

पित्यानं मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकले टेडी बिअरमध्ये, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

बाप-लेकाच्या नात्याचा हा VIDEO पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

केडेकोटा, 22 सप्टेंबर : आपल्या तरुण मुलाला गमवण्याचे दुःख आई-वडिलांशिवाय कोणीच समजू शकत नाही. अमेरिकेच्या केडेकोटा येथील जॉन रीड यांच्या 16 वर्षीय मुलाचा मागील वर्षी कार अपघातात मृत्यु झाला होता. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एवढा भावूक करणारा आहे की, पाहिल्यावर तुमच्या डोळ्यांतदेखील पाणी येईल. त्यांच्या 16 वर्षीय मुलाचा कार अपघातात मृत्यु झाल्यानंतर त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

अवयव दानाच्या या या निर्णयाने एका व्यक्तीला जीवदान मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक टेडी बिअर भेट म्हणून मिळाला. ज्या व्यक्तीच्या शरीरात त्यांच्या मुलाचे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते, त्या व्यक्तीने त्यांना हा टेडी बिअर भेट म्हणून पाठवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत 1 कोटी 25 लाख जणांनी तो पहिला आहे. रेक्स चॅपमन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या twitter अकाउंटवर पोस्ट केला असून, याला 2 लाख 80 हजार लाईक्सदेखील मिळाले आहेत. 80 हजार जणांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, अजूनही मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर लोकं प्रतिक्रिया देत आहेत.

वाचा-दारूच्या नशेत 3.5 कोटींच्या पॉर्शचा केला चुराडा, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTO

वाचा-झेब्रानं दिला अनोख्या पिलाला जन्म, PHOTO पाहून विश्वास बसणार नाही

हा टेडी बिअर भेट म्हणून दिल्यानंतर जॉन यांना रडू कोसळले. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, टेडी बिअर छातीला लावून जॉन आपल्या मुलाच्या हृदयाचे ठोके जणू ऐकताना दिसत आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करत असलेल्या आपल्या पत्नीलादेखील त्यांनी व्हिडीओ थांबवण्यास सांगतात. त्यामुळे या वडील आणि मुलाचं नातं किती घट्ट आणि प्रेमाचं असेल हे आपण या व्हिडीओमधून पाहू शकतो. या टेडी बिअरमध्ये त्यांच्या मुलाच्या हृदयाचे ठोके रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

वाचा-अजून काय पाहाचयं बाकी आहे? सिगरेटचा धूर उडवताना दिसला चक्क खेकडा, VIDEO VIRAL

दरम्यान, जॉन सांगतात की, ते दररोज रात्री तासन् तास टेडी बिअरला आपल्या छातीशी घेऊन मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकत असतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण त्यांच्या अवयव दानाच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत. तर अनेकजण त्यांचं सांत्वनदेखील करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर देखील अनेकांनी हा खूप हृदयस्पर्शी व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 22, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या