VIDEO : वऱ्हाड्यांसह दुसऱ्याच्या लग्नमंडपात पोहोचला नवरदेव; विधी सुरू होताच...

VIDEO : वऱ्हाड्यांसह दुसऱ्याच्या लग्नमंडपात पोहोचला नवरदेव; विधी सुरू होताच...

स्वत:च्या लग्नाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती उत्सुक असते. तो दिवस नवरदेव आणि नवरीमुलगीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की नवरदेव स्वत:च्या लग्न समारंभाऐवजी दुसऱ्याच्या लग्नमंडपात पोहोचला?

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : स्वत:च्या लग्नाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती उत्सुक असते. तो दिवस नवरदेव आणि नवरीमुलगीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की नवरदेव स्वत:च्या लग्न समारंभाऐवजी दुसऱ्याच्या लग्नमंडपात पोहोचला? आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. जेथे असाच एक प्रकार समोर आला आहे.

ट्रिब्यूनन्यूज डॉट कॉमनुसार ही घटना इंडोनेशियाच्या (Indonesia) सेंट्रल जावा (Central Java) स्थित मेगलँगमध्ये (Magelang) एका लग्न समारंभात  गूगल मॅपचा (Google Maps) वापर केल्यामुळे झाला. या महिन्याच्या सुरुवातीला 4 एप्रिल रोजी या नवरदेवाने सांगितलं की, तो आपल्या लग्न समारंभाऐवजी कोणा दुसऱ्याच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचला. गूगल मॅपने (Google Maps) त्याला चुकीचा रस्ता दाखवला.

नवरदेव गाडीत गूगल मॅपला फॉलो करीत वेडिंग वेन्यूच्या दिशेने निघाला. मात्र तो दुसऱ्याच ठिकाणी पोहोचला. त्या मंडपात दुसऱ्याच कोणाच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती. नवरदेवाची गाडीही नेमकी त्याच ठिकाणी थांबली. तेथे दुसऱ्या दाम्पत्याचा साखरपुडा सुरू होणार होता आणि त्या दरम्यान त्याचे कुटुंबीय आणि फोटो ग्राफर्सदेखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञातपणे नवरदेवाने दुसऱ्या साखरपुड्यातील कुटुंबाशी हात मिळवणी केली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी साखरपुडा आयोजित केला होतास त्या कुटुंबाने या नवरदेवाचं स्वागतही केलं. नवरीच्या नातेवाईकांना वाटलं की ही सर्व मंडळी नवरदेवाच्या घरातील आहेत. त्याचं झालं असं साखरपुड्यासाठी पोहोचायला त्या नवरदेवाला आणि त्याच्या नातेवाईकांना उशीर झाला होता.

हे ही वाचा-पोलिसांनी भररस्त्यात तरुण-तरुणीला घातली गोळी; व्हायरल VIDEO मागील काय आहे सत्य?

नवरीने TribunNews.com ला सांगितलं की, ती सारखपुड्याची तयारी करीत होती. मात्र जसं विधीसाठी नवरदेव समोर आला, ती गोंधळलीच. जेव्हा नेमका प्रकार समोर आला, त्यानंतर नवरदेव आणि त्याचे नातेवाईकांनी माफी मागितली व ते मंडपाच्या बाहेर पडले. याबाबत नवरीने सांगितलं की, जेव्हा इंटरनेट व्यवस्थित चालत नाही, अशा वेळी जवळील लोकेशनवर शिफ्ट होता. त्या नवरदेवाचा लग्नमंडळ येथील नवरीच्या घराच्या जवळ होता. या घटनेचा व्हिडिओ ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 15, 2021, 7:33 PM IST

ताज्या बातम्या