• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : लग्नापूर्वी होणाऱ्या नवऱ्यासह परीक्षा देण्यासाठी पोहोचली नवरी; होतोय कौतुकांचा वर्षाव

VIDEO : लग्नापूर्वी होणाऱ्या नवऱ्यासह परीक्षा देण्यासाठी पोहोचली नवरी; होतोय कौतुकांचा वर्षाव

या नवरीचा एक VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचं मोठं कौतुक केलं जात आहे.

 • Share this:
  राजकोट, 24 नोव्हेंहर : लग्नाच्या (Marriage) वेळी नवरदेव असो वा नवरी..दोघेही तयार होण्यात आणि आयुष्याची नवी स्वप्न रचत असतात. मात्र गुजरातमधील (Gujrat News) एका तरुणीने लग्नाच्या गोंधळादरम्यान परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात पोहोचली. सोशल मीडियावर या तरुणीचं मोठं कौतुक केलं जात आहे. राजकोटची राहणारी शिवांगी जेव्हा लग्नाचा पोशाख करून परीक्षा केंद्रात पोहोचली तर सर्वजण हैराण झाले. परीक्षा हॉलमध्ये नटलेली नवरी पाहून विद्यार्थ्यांना विश्वासच बसला नाही, की ही तरुणी परीक्षा देण्यासाठी आली आहे. जेव्हा शिवांगी आपलीय कहाणी सांगितली तर परीक्षा हॉलेमध्ये टीचर्स आणि विद्यार्थी प्रभावीत झाले. शिवांगी बागथारिया आपल्या होणाऱ्या पतीसह सकाळी सकाळी शांति निकेतन कॉलेज बॅचलर ऑफ सोशल वर्कच्या 5 व्या सेमिस्टरची परीक्षा देण्यासाठी पोहोचली. शिवांगीने लग्नाच्या आधी परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे ही वाचा-होमवर्क न केल्याबद्दल पित्याने दिली राक्षसी शिक्षा, आईने रेकॉर्ड केला VIDEO आई-वडील आणि सासरच्या मंडळींनीही दिली साथ... परीक्षा दिल्यानंतर शिवांगीने टाइम्स ऑफ इंडियाशी बातचीत केली. शिवांगीने सांगितलं की, जेव्हा तिच्या लग्नाची तारीख ठरविण्यात आली होती, तेव्हा परीक्षेच्या तारख्या जाहीर झाल्या नव्हत्या. मात्र योगायोगाने लग्नाची तारीख आणि परीक्षा एकाच दिवशी आली. शिवांगीला परीक्षा द्यायची होती. त्यामुळे शिवांगीने आई-बाबांना आणि सासरच्या मंडळींना याबद्दल सांगितलं. यावर दोन्ही कुटुंबांनी शिवांगीच्या परीक्षेला अधिक महत्त्व दिलं. त्यांनी सांगितलं की, लग्नाच्या मुहूर्तासाठी प्रतीक्षा केली जाऊ शकते, यानंतर होणाऱ्या पतीने शिवांगी परीक्षा केंद्रापर्यंत सोडलं.
  शिवांगीने केवळ परीक्षाच वेळेवर दिली असं नाही तर परीक्षा संपल्यानंतर वेळेवर लग्नासाठी मंडपातही दाखल झाली. शिवांगीने सांगितलं की, शिक्षण प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि आई-वडिलांनी आपल्या मुलीनाही शिक्षणाचे धडे द्यायला हवेत. शिवांगीने आपल्या शिक्षणाला महत्त्व दिलं, त्याचवेळी तिचा पती आणि सासरच्या मंडळींनीही तिला पाठिंबा दिला. शिवांगीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: