Home /News /viral /

VIDEO : धबधब्याजवळील रम्य ठिकाणी गर्लफ्रेंडला करणार होता प्रपोज; तेव्हाच घडली भयंकर दुर्घटना

VIDEO : धबधब्याजवळील रम्य ठिकाणी गर्लफ्रेंडला करणार होता प्रपोज; तेव्हाच घडली भयंकर दुर्घटना

गर्लफ्रेंडला प्रपोज करणं कायम आठवणीत राहावं, यासाठी तरुण विविध प्रकारच्या आयडीया लढवतात.

    नवी दिल्ली, 13 जानेवारी : गर्लफ्रेंडला प्रपोज (propose a girlfriend) करणं कायम आठवणीत राहावं, यासाठी तरुण विविध प्रकारच्या आयडीया लढवतात. ती मुलगी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, यासाठी ते विविध पर्याय अवलंबतात. काही डोंगरावर नेत प्रपोज करतात, तर काही डिनरला नेत वाईन ग्लासमध्ये रिंग ठेवतात. अशा या ना त्या प्रकारे मुलीला स्पेशल वाटावं हा त्यामागील प्रयत्न असतो. केलेला प्रयत्न यशस्वी झाला तर सोनेपे सुहागा..मात्र हा प्रयत्न फसला तरी आयुष्यभर लक्षात राहतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On social Media) झाला आहे. या व्हिडीओमध्ये पठ्ठ्याने आपल्याला आवडणाऱ्या तरुणीला धबधब्याजवळ प्रपोज करण्याचं ठरवलं. तो तिला त्या जागी घेऊनही आला. निसर्गाचं सुंदर रूप पाहून कोणाचंही मन मोहून निघेल. हे ही वाचा-VIDEO : डान्स करताना केलेली एक चूक भोवली; मंडपातच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव तो धबधब्याजवळील एका डोंगरावर दरीला लागून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी पोहोचला. आता तो क्षण आला होता. तो गर्लफ्रेंडला आपल्या मनातील ती गोष्ट सांगण्याच्या तयारीत होता. त्याने हळूच खिशात हात घातला आणि एक सुंदरशी रिंग बाहेर काढली. दरम्यान तो गुघड्यावर बसण्याच्या तयारीत असताना त्याच्या हातातील रिंग थेट दरीत पडली. हे सर्व पाहून गर्लफ्रेंडला धक्काच बसला. या व्हिडीओनंतर मुलालाही धक्का बसल्याचं दिसत आहे. मुलगी रिंग खरंच दरीत कोसळल्याचं पाहण्यासाठी पुढे गेली.  यानंतर मागून प्रियकर दुसरी खरी रिंग घेऊन आला आणि त्याने सर्वांसमोर मुलीला प्रपोज केलं.  यानंतर तिच्या आनंदाचा पारावार उरला नाही. मागे एक व्यक्ती हे सर्व शूट करीत होती. आतापर्यंत या व्हिडीओला 4.7 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Girlfriend, Video viral, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या