• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : पार्कमध्ये घडला बॉडी शेमिंगचा प्रकार, 'too short' म्हणत पोलिसांनी काढलं बाहेर

VIDEO : पार्कमध्ये घडला बॉडी शेमिंगचा प्रकार, 'too short' म्हणत पोलिसांनी काढलं बाहेर

बॉडी शेमिंगच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  अमेरिका, 13 मे : अमेरिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना थीम पार्कमधील असून महिलेला तिच्या कप़ड्यांमुळे अटकेची धमकी देण्यात आली आहे. ओकलाहोमा शहरात एका थीम पार्कमधून हा प्रकार समोर आला. बेली नावाच्या महिलेने यासंदर्भातील एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. यामध्ये तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असल्याचं तिने सांगितलं. कोरोनाच्या महामारीत एक चांगली सुट्टी घालविण्यासाठी आम्ही ओकलाहोमा शहरात गेले होतो. येथे आम्ही धमाल करीत होता. राइड्सचा आनंदही घेत होतो. साधारण 7 वाजता पार्कमधील पोलीस माझ्या मुलीवर ओरडू लागले. यावेळी ती माझ्या शेजारीच होती. हिल्स घालून डोंगर चढत असल्याने तिला ओरडत होते. त्यानंतर मात्र तिने माझा पाठलाग केला व माझ्या हाताला पकडून मागे खेचलं. यावेळी ती मला माझ्या कपड्यांवरुन ओरडत होती. हे ही वाचा-अरे बापरे! हे काय भलतंच? टॉन्सिल शस्त्रक्रियेनंतर 'ती' वेगळ्याच भाषेत बोलू लागली यावेळी पार्कच्या मॅनेजरने पैसे देऊन तेथील शूज विकत घेण्याची सूचनाही केली. बेलीला सुरुवातील वाटतं की, पार्कमध्ये तिच्यावर काहीही खरेदी करण्याची जबरदस्ती नाही. त्यानंतर बेलीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्यानंतर मला धक्काबुक्की करण्यात आली आणि प्रवेश गेटजवळ नेण्यात आलं. तसं पाहता आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. मात्र तरीही येथील महिला अधिकारी त्यांच्याकडून ID ची मागणी करू लागली. त्यांना यामागील कारण विचारलं असता, ते पोलीस असल्याचं सांगितलं. हा सर्व प्रकार आम्ही रेकॉर्ड करीत असल्याचं बेलीने सांगितलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: