Home /News /viral /

बापरे! थेट विमानतळावर पोहोचला भला मोठा विषारी साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIRAL VIDEO

बापरे! थेट विमानतळावर पोहोचला भला मोठा विषारी साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIRAL VIDEO

Snake Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरात व्हायरल होतं असून त्यामध्ये एक विषारी साप थेट विमानतळावर (Venomous snake at airport) जाऊन पोहचल्याचं दिसत आहे. या सापाला पाहून अनेक प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल: सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ (Social media viral video) व्हायरल होतं असतात. यामध्ये कधी कधी आपण विचारही करू शकत नाही, अशा घटना चित्रीत केलेल्या असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरात व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक विषारी साप थेट विमानतळावर (Venomous snake at airport)  पोहचला आहे. हा साप विमानतळावरील प्रतीक्षागृहातील बाकांखालून सरपटत जात आहे. विमानतळावरील एका प्रवाशानं हा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत केला असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होताना दिसत आहे. खरंतर, साप हा पृथ्वीवरील सर्वाधिक विषारी प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे साप हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांचा भीतीने थरकाप होतो. अशा अवस्थेत एक विषारी साप थेट विमानतळावर येऊन पोहचणं कल्पनाही करवत नाही. अशावेळी साप विमानतळावरील बाकांखालून जात असताना प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली असून अनेकांनी आपल्या बॅगा जागेवरच ठेवून पळ काढला आहे. 'द सन' या ट्विटर अकाऊंटवरून संबंधित व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. हे ही वाचा-VIDEO- सिंहाला पाहून पळत होता; जंगलाच्या राजाने झेप घेत मागून पंजात पकडलं आणि... संबंधित व्हिडीओ 2018 या वर्षातील असून एका विमानतळावर चित्रीत करण्यात आला होता. हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या विमानतळावर शूट केला आहे, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. हा जुना व्हिडीओ असला तरी पुन्हा नव्याने व्हायरल होताना दिसत आहे. 'द सन' ने हा व्हिडीओ शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'कल्पना करा, तुम्ही विमानतळावर बसला आहात आणि अचानक तुम्हाला असं दृश्य दिसतं.' द सनने शेअर केलेल्या या व्हिडीओला अवघ्या दोन तासांत सुमारे 61 हजाराहून अधिक जणांनी पाहिलं असून काही जणांनी हा व्हिडीओ रिट्वीटही केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Snake video, Video viral

    पुढील बातम्या