मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! 18 किलोचे सीताफळ अन् 15 किलोचा भोपळा, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

बापरे! 18 किलोचे सीताफळ अन् 15 किलोचा भोपळा, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

शेतकऱ्यांने आपल्या शेतात भला मोठा सीताफळ आणि भोपळा पिकवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

शेतकऱ्यांने आपल्या शेतात भला मोठा सीताफळ आणि भोपळा पिकवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

शेतकऱ्यांने आपल्या शेतात भला मोठा सीताफळ आणि भोपळा पिकवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

विक्रम कुमार झा (पूर्णिया), 26 मार्च : तुम्ही जर शेती करत असाल तर तुमच्या शेतात किंवा घराच्या बागेत सीताफळ आणि भोपळा पिकवला असाल.तुम्ही पिकवलेल्या भोपळा आणि सीताफळ अंदाजे 10 किलोच्या आतील पाहिला असाल. पण 18 किलोचे सीताफळ आणि 15 किलोचा भोपळा पाहिला आहे का? नाही ना एका शेतकऱ्यांने आपल्या शेतात भला मोठा सीताफळ आणि भोपळा पिकवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

दीपू कुमार सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीच्या पद्धती आणि सेंद्रिय खतांच्या सहाय्याने दिपू यांनी अनेक भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. दिपूकुमार यांनी शेती पद्धतीत केलेल्या बदलामुळे त्यांनी अल्पावधीत प्रसिद्धी मिळवली आहे. सेंद्रिय उत्पादनातून 23 किलो वजनाचा भोपळा तयार करून त्यांनी आपलं नाव पंचक्रोशीत फेमस केलं आहे.

"या"ठिकाणी मुस्लिम करताय 'नवरात्रीचे उपवास' तर हिंदू ठेवताय 'रोजे', VIDEO

बिहारमधील पूर्णिया शहरातील शेतकरी सुरेंद्र तुडू म्हणाले की, सिताफळ आणि भोपळ्याचे इतके वजन आणि आकार आयुष्यात पहिल्यांदाच बघितला आहे. त्यांनी केलेल्या शेतीची पद्धत ऐकून मलाही याबाबत उत्सुकता लागल्याचे तुडू यांनी सांगितलं.

कटिहार जिल्ह्यातील मनिहारी येथील शेतकरी दिपू कुमार सिंह यांनी न्यूज18 लोकलला सांगितले की, विभागीय स्तरावरील कृषी प्रदर्शन मेळ्यात सेंद्रिय उत्पादनांच्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने त्यांना आमंत्रित केले होते. यामुळे मी 18 किलोचे सिताफळ आणि 15 किलोचा भोपळा आपल्या सेंद्रिय शेतीतून उत्पादन घेतले आहे. यानंतर त्यांनी तो प्रदर्शनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कृषी प्रदर्शनानंतर भोपळा आणि सीताफळ शेती पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागल्याचे त्यांनी सांगितलं.

दिपूर किमार सिंग सांगतात की, आम्ही पिकवलेल्या शेतात अंदाजे सीताफळाचे वजन 18 किलो आहे. पण त्याहूनही मोठे सीताफळ यापूर्वी मी पिकवल्याचे त्यांनी सांगितलं. अंदाजे  23 किलोपर्यंत आमच्या शेतात सीताफळ पिकवल्याचे त्यांनी सांगितलं. 

पंतप्रधान मोदी यांनाही मिठाईची भुरळ; या मिठाईची चवच न्यारी, पाहा VIDEO

एवढ्या मोठ्या प्रमाणातील सीताफळ तयार होण्यासाठी किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागल्याने ते प्लांटमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर  मी गेली अनेक वर्षे सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतात रासायनिक खतांचा वापर करू नका, असेही कुमार यांनी सांगितलं. तुम्ही सेंद्रिय खते आणि देशी गोवर कंपोस्ट घालून हे करू शकता. ज्या शेतीतून तुम्ही असे पीक घेता त्यामध्ये तुम्ही कृषी विभागाचा सल्ला घेऊन काम करत चला असेही आवाहन त्यांनी केले. याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांनी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

First published:
top videos

    Tags: Bihar, Farmer, Local18