रवी पांडे (वाराणसी), 02 एप्रिल : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने पोलिसही हादरले आहेत. याबाबत जैतपुरा पोलीस ठाण्यात एका तरुणाने येऊन आपल्या प्रेयसीचा खून केल्याचे कबूल केले आहे. दरम्यान ज्या ठिकाणी खून केला याचे ठिकाण सांगताच पोलिसांनाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे. 20 वर्षीय तरुणीचा कापडाने बांधलेला मृतदेह घरातील पाणी जाण्याच्या चेंबरमध्ये घातल्याचे निदर्शनास आले.
जैतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागेश्वरी मंदिराजवळ ही घटना घडली आहे. घरातील ड्रेनेज पाणी जाण्यासाठी केलेल्या चेंबरमध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान मृतदेह सापडलेली मुलगी ही या घरामध्ये साफसफाईचे काम करत होती. सोनम असे त्या मुलीचे नाव असून ती सोनकर कुटुंबीयांकडे कामाला जात होते.
दरम्यान सोनकर यांच्याकडे काम करणाऱ्या रिझवान या तरुणाने तीचा खून केल्याचे समोर आले आहे. ओढणीने तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर सोनमचा मृतदेह घरातच बांधलेल्या ड्रेनेजमध्ये घातल्याचा प्रकारसमोर आला आहे.
रिजवान आणि सोनम हे दोघेही सोनकर कुटुंबीयांच्या घरी काम करायचे. सोनम घरातील साफसफाईचे काम करयाची. तर रिझवान तिथे विणकर म्हणून काम करायचा. काशी झोनचे डीसीपी आर. एस गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान आणि सोनम यांची चांगली मैत्री होती. यामैत्रीचे त्यांच्यात प्रेमात रुपांतर झाले. दरम्यान रिझवान आणि सोनम यांच्या काल किरकोळ गोष्टीवरून वाद झाला.
त्यानंतर रिझवानने सोनमचा ओढणीने गळा दाबला यातच तिचा मृत्यू झाला. आधी रिजवानने मृतदेह लपवण्यासाठी त्याने घरातील ड्रेनेज चेंबरमध्ये मृतदेह ठेवला. परंतु घाबरून तो पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला यावेळी त्याने खुनाची कबुली देत मृतदेह कुठे लपवला होता, हे सांगितले.
विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ केला अन्…, अमरावतीमधील खळबळजनक घटना
रिझवानने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन हत्येची कबुली देत जागा सांगितली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करत मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रिजवानला अटक केल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करत आहेत. यासोबतच पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून रिजवानविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Uttar pradesh, Uttar pradesh news