मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : बाबा, बायकांवर लय पैसा उडतो! मुलाला झालीय Valentines dayची अॅलर्जी

VIDEO : बाबा, बायकांवर लय पैसा उडतो! मुलाला झालीय Valentines dayची अॅलर्जी

पैस उडतो म्हणून मुलाला प्रेयसी नको, Valentines dayआधी बापानं शूट केला मुलाचा VIDEO

पैस उडतो म्हणून मुलाला प्रेयसी नको, Valentines dayआधी बापानं शूट केला मुलाचा VIDEO

पैस उडतो म्हणून मुलाला प्रेयसी नको, Valentines dayआधी बापानं शूट केला मुलाचा VIDEO

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 31 जानेवारी: बरोबर आठवड्याभरानं प्रेमाचे दिवस म्हणजे Valentines week सुरु होणार आहे. परदेशातून भारतात आलेलं Valentines day साजरं करण्याचं लोण नवख्या तरुणांमध्ये चांगलंच रुळलं आहे. या दिवशी प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांना महागडे गिफ्ट फुलं देऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याचा नवा फंडा आला आहे. दिवसेंदिवस बदलत चालेलं हे Valentines dayचं स्वरूप मुलांच्या खिशाला न परवडणारं असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर चक्क 8 वर्षांच्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या मुलाने जे व्हिडिओमध्ये सांगितलं ते ऐकून भल्याभल्यांचा भुवया उंचावल्याशिवाय राहात नाहीत. जे या मुलाला कळलं ते नव्या प्रेम करणाऱ्या आणि लग्न करणाऱ्या तरुणांना कधी कळणार? य़ा 8 वर्षांच्या चिमुकल्याला आयुष्याचं सार कळलंय राव! अशा कॅप्शननं हा व्हिडिओ वैभव शेटकर यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडिओनं सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं त्याचा बाजार होऊ नये, महागडे गिफ्ट अवाजवी मागण्या आणि महिलांची हौस पुरवता पुरवता होणारी मुलांची तारांबळ अशा व्यथा ह्या व्हिडिओमध्ये या 8 वर्षांच्या चिमुकल्यानं मांडल्या आहेत. बायको का नको याचं थेट उत्तरच त्यानं आपल्या वडिलांना दिलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ शेअर होत आहे. या चिमुकल्यानं आपल्याला बायको नको आणि का नको याचं थेट उत्तर आपल्या वडिलांना अगदी निरागसपणे दिलं आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ त्याचाच वडिलांनी शूट केला आहे.

First published:

Tags: Valentine's day, Video viral