मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मुलं धोकेबाज असतात, कुत्र्यावर प्रेम कर', Valentine Weekमध्ये तुफान VIRAL होत आहेत 5 VIDEO

'मुलं धोकेबाज असतात, कुत्र्यावर प्रेम कर', Valentine Weekमध्ये तुफान VIRAL होत आहेत 5 VIDEO

'रोझ डे'ला तुफान VIRAL होत आहेत हे 5 Tik Tok VIDEO

'रोझ डे'ला तुफान VIRAL होत आहेत हे 5 Tik Tok VIDEO

'रोझ डे'ला तुफान VIRAL होत आहेत हे 5 Tik Tok VIDEO

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 07 फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन विक आजपासून सुरू झाला आहे. या व्हॅलेंटाईनमधील पहिला दिवस म्हणजे रोज डे. या दिवसानिमित्तानं सोशल मीडियावर अनेक सिंगल असणाऱ्या तरुणांकडून मीम्स, जोक्य आणि व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. यामध्ये जगभरात सर्वातधिक वापरलं जाणारं tik tok तरी कसं मागे राहिल. टिक टॉकवरही व्हॅलेंटाईन विकचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या निमित्तानं आजचे 5 गमतीशीर ट्रेन्डिंग व्हिडिओ आज तुम्ही पाहू शकता.

मुली कायम प्रेमात धोका देतात असा मुलांचा आरोप असतो. त्यामुळे एका तरुणानं चक्क कुत्र्यालाच लाल गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केल्याचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला टिक टॉकवर आतापर्यंत 229.9K likes, 709 कमेंट्स मिळाल्या आहेत.

@olle_lab#unlockvivov17 #petbff #doglover #foryoupage #tiktok_india♬ original sound - sunny bhavsar

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक मुलगी आपल्या मित्र-मैत्रीणींना आपल्या बॉयफ्रेन्डबद्दल सांगते. आजकाल सगळीच मुलं गद्दार असतात असा आरोप केल्यानंतर मित्र चिडतो आणि म्हणतो हा ठिक आहे मग कुत्र्यावर प्रेम कर ते इमानदार असतात. हा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान ट्रेन्ड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 1.3 मिलियन लाईक्स आणि 2.3 हजार कमेंट्स या व्हिडिओला मिळाल्या आहेत. यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला बाकी काही नसलं तरी कुत्र्यांच्या इमानदारीला मात्र फार महत्त्व असल्याचं या दोन्ही व्हिडिओमधून दिसून येत आहे.

@nandu_pandeyBach gya main 😂 #comedy #funny #15svines #nkp90 #trending #tiktokindia_ #foryou secretstar0077♬ original sound - NANDU kr. PANDEY हेही वाचा-VIDEO : 'ए इकडे ये, माझ्या पायातले बूट काढ,' वनमंत्र्यांची पुन्हा मुजोरी

दोन मित्र गप्पा मारत असतात. त्यावेळी एक मित्र दुसऱ्याला म्हणतो मला ABCD ऐकवून दाखव. त्यावर दुसरा मित्र G,F सोडून नीट एबीसीडी पूर्ण करतो. त्यावर पहिला मित्र विचारतो GF नाही का? दुसरा मित्र म्हणतो ती तर आपल्या नशीबातच नाही राव. या व्हिडिओला 91.1 हजार लाईक्स तर 197 कमेंट्स मिळाल्या आहेत.

@premsahu486🙄 किस्मत में नई है 😂 #प्रेम_साहू_कॉमेडी_किंग #छहत्तीसगढ़ीया #छत्तिसगढ़ #cgfam #कॉमेडी #इस_वीडियो_को_वाइरल_कर_दो♬ original sound - 🙏CG TURA PREM SAHU?

कॉलेजमधील मुलांच्या ग्रूपमधील एक तरुण लाल गुलाबाचं फूल घेऊन मुलींना प्रपोज करण्यासाठी कट्ट्यावर जात असतो. तरुण आपल्याला प्रपोज करण्यासाठी येत असल्याचं पाहून मुली तिथून पळून जातात. त्यावेळी तरुणाची रिअॅक्सन काय आहे पाहा व्हिडिओ. या व्हिडिओला 233.9 हजार लाईक्स आणि 259 कमेंट्स आल्या आहेत.

@lovetadviHappy Valentine day♬ original sound - Meet_037 😋

सोशल मीडियावर एक हटके आणि भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तरुण ओठोंपे ऐसी बात या गाण्यावर डान्स करत आहे. यात नवल हे की हा डान्स तरुण वानरांसमोर करत आहे. त्यावर वानरांनीही त्याला फॉलो करत डान्स केला आहे. माकडांसह डान्स केलेल्या तरुणाच्या या व्हिडिओला 3मिलियन लाईक्स आणि 4.8 हजार कमेंट्स आल्या आहेत. तरुणाला गर्लफ्रेंड मिळाली नाही म्हणून माकडांसमोर असा डान्स करावा मजेशीर चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.

@makwanasahil2hoto me USi bat #tiktok_india ##anime #foryourpage #duetwith😜😜😜 #foryopage♬ original sound - Somi_Somi

एकूणच सोशल मीडियावर सिंगल असणाऱ्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे आधीच तुफान धुमाकूळ घातला आहे. व्हॅलेंटाईन आठवड्याच्या सुरुवातीलाच तरुण-तरुणींनी प्रेमात धोका दिला जातो त्यामुळे त्यात न पडलेलंच बर असं म्हणताना इमानदार कुत्र्याचं वर्णन केल्यानं त्याला असलेला भाव वाढल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा-शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या बछड्याशी सरड्याने घेतला पंगा! थरारक VIDEO

First published:

Tags: Rose day, Tik tok, Valentine day, Valentines Day 2020, Viral video.