मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: शांतपण घरात घुसला बिबट्या, कुत्र्याने भुंकायला सुरुवात करताच त्याला जबड्यात पकडलं आणि...

VIDEO: शांतपण घरात घुसला बिबट्या, कुत्र्याने भुंकायला सुरुवात करताच त्याला जबड्यात पकडलं आणि...

कुत्र्याची शिकार करतानाचा बिबट्याचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. एका रात्री एक बिबट्या या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या घरात घुसतो.

  • Published by:  Janhavi Bhatkar
तालीतल, उत्तराखंड, 20 जुलै : मानवी वस्तीत जंगलातील प्राणी विशेषत: बिबट्या घुसण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशावेळी काही प्रसंग असे घडतात की अंगावर शहारा आणणारे ठरतात. बिबट्याने हल्ला केल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. दरम्यान कुत्र्याची शिकार करतानाचा बिबट्याचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. एका रात्री एक बिबट्या या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या घरात घुसतो. अगदी शांतपणे तो वावरत असतो आणि बाहेर पडतो. पण थोड्याच वेळात त्याठिकाणी असणारा कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागतो. ते पाहून बिबट्या मागे फिरतो आणि कुत्र्याला जबड्यात पकडून घेऊन जातो. या थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ANI ने त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. (हे वाचा-खाण्यावरून तीन हत्ती भिडले, जबरदस्त लढाईचा पाहा दुर्मीळ VIDEO) हा व्हिडीओ उत्तराखंडमधील तालीतल या भागातील आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच अंगावर काटा उभा राहतो. यामध्ये बिबट्या इतक्या चपळाईने कुत्र्याला घेऊन जातो की त्याचा मालक देखील काहीच करू शकत नव्हता. तो शेवटी फक्त कुत्र्याला जाताना बघत राहतो. हा व्हिडीओ आतापर्यंत 42 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 300 हून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओवर लोकं कुत्र्याबाबत कमेंट करत आहेत. मालकाला सावधान करताना कुत्र्याला जीव गमवावा लागला अशा आशयाच्या कमेंट्स यावर येत आहेत. (हे वाचा-या बाळाला खरंच आहे तिसरा डोळा? वाचा या VIRAL VIDEO मागचे सत्य) (हे वाचा-100 फुटांवरून खाली पडला 2 वर्षांचा चिमुकला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO) संपादन - जान्हवी भाटकर
First published:

पुढील बातम्या