मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नंदुरबारनंतर आणखीन एक भीषण अपघात, 150 मीटर दूरपर्यंत आडवी घसरत गेली बस, पाहा LIVE VIDEO

नंदुरबारनंतर आणखीन एक भीषण अपघात, 150 मीटर दूरपर्यंत आडवी घसरत गेली बस, पाहा LIVE VIDEO

नंदुरबार इथे सकाळी खासगी बस कोसळून अपघात झाला. त्यानंतर आणखीन एका भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

बाजपूर (उत्तराखंड) 21 ऑक्टोबर : नंदुरबार इथे सकाळी खासगी बस कोसळून अपघात झाला. त्यानंतर आणखीन एका भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. नंदुरबारमध्ये 40 फूट खोल दरीत जळगावहून सूरतच्या दिशेनं निघालेली बस दरीत कोसळली तर दुसऱ्या अपघातात भरधाव वेगात असलेली बस अचानक उलटली आणि 150 मीटर दूरपर्यंत आडवी घसरत गेली.

उत्तराखंडमधील बाजपूर इथे बस उलटून मोठी दुर्घटना घडली. रविवारी पाहाटे 3 वाजता हा अपघात घडला आहे. या भयंकर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

" isDesktop="true" id="489556" >

हे वाचा-चाकत अडकलेल्या 3 फूट अजगराचा महिलेनं जीव वाचवला पण... पाहा VIDEO

धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून जात असताना 30 ते 40 फूट खोल दरीत ही खासगी बस कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 35 प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Uttarakhand