मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पैसे जमा कर आणि 4 झाडं तोड, लाच घेताना पोलिसाचा धक्कादायक VIDEO

पैसे जमा कर आणि 4 झाडं तोड, लाच घेताना पोलिसाचा धक्कादायक VIDEO

पैशांच्या बदल्यात 4 झाडं कापण्याची परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पैशांच्या बदल्यात 4 झाडं कापण्याची परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पैशांच्या बदल्यात 4 झाडं कापण्याची परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

लखीमपुर-खीरी, 13 नोव्हेंबर : चुकीच्या गोष्टींवर लगाम घालणं आणि शिक्षा करण्याचं काम खाकीचं असतं मात्र पैशांच्या मोहापाई जेव्हा पोलीसच भ्रष्टाचार करायला लागतात तेव्हा मोठा गदारोळ निर्माण होतो. पैशांच्या बदल्यात 4 झाडं कापण्याची परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार थांबण्याचं नावच घेत नाही. लखीमपुरा खीरी हे भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं ठिकाण मानलं जात.

तिकुनिया कोतवालीमध्ये निरीक्षक साहेब लाकूड कंत्राटदाराला भ्रष्टाचाराचे ज्ञान पाझळताना दिसत आहे. पोलिस ठाण्यात पैसे जमा केल्यानंतर एका झाडाऐवजी ओव्हरलोडिंग आणि 4 झाडे तोडण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यासाठी लागणारी परवानगी देण्यासाठी पोलीस निरीक्षक तयार झाले आहेत फक्त वेळेत पैसे पोहोचते करा असा सल्ला ते देताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

" isDesktop="true" id="496393" >

हे वाचा-विजेचा शॉक देऊन पकडणार होते मासे पण झाले उलटे, चुलते-पुतण्याचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील लखीमपुरा इथे तैनात निरीक्षक हनुमंत प्रसाद वन कंत्राटदार वनविभागाची झाडे तोडण्यासाठी परवानगी घेऊन कोतवाली येथे पोहोचले. निरीक्षक हनुमंत प्रसाद कंत्राटदाराला लाकूड खरेदीच्या टक्केवारीनुसार पैसे गोळा करून लाकूड तोडण्यास सांगत आहेत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की वनविभागाच्या कंत्राटदाराकडून पैसे मागितले जात आहे. पैसे मिळाले तर दुप्पट झाडं तोडायची परवानगी देऊ असा सल्ला देखील हे पोलीस निरीक्षक देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पोलीस निरीक्षकाची चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Uttar pradesh