मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणीची छेड काढणं पडलं महागात, 1 मिनिटांत मिळाला 15 चपलांचा प्रसाद, पाहा VIDEO

तरुणीची छेड काढणं पडलं महागात, 1 मिनिटांत मिळाला 15 चपलांचा प्रसाद, पाहा VIDEO

या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    बहराइच, 06 सप्टेंबर : मनमानी करणाऱ्या आणि तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला चांगली अद्दल घडवली आहे. भररस्त्यात छेड काढणाऱ्याला चपलांनी धू-धू धूतलं आहे. उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी एका युवकाला चपलेने मारहाण करीत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ तीन दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही मुलगी या तरुणाला 1 मिनिटांत डजनभरहून अधिक वेळा चपलेनं मारहाण केली आहे. हा तरुण सतत या मुलीला त्रास देत होता. या तरुणीनं भररस्त्यात या तरुणाला चपलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना बहराइचमधल्या कोतवाली नगरातील काझीपुरा परिसर घडल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-शेकडो कळ्यांचा जीव घेणाऱ्या डॉ.सुदाम मुंडेला पुन्हा बेड्या, असं थाटलं होतं दुकान व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुणीचा भाऊ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरीही तरुणी ऐकत नाही. तरुणी त्याला मारहाण करत राहाते. भर बाजारात या तरुणानं छेड काढल्याच्या रागातून तरुणीनं त्याला धडा शिकवला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh news, Viral video.

    पुढील बातम्या