मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीनेच उडवला लग्नाचा 'बार'; स्टेजवर येताच स्वतः बंदूक काढून गोळी झाडल्याचा VIDEO VIRAL

नवरीनेच उडवला लग्नाचा 'बार'; स्टेजवर येताच स्वतः बंदूक काढून गोळी झाडल्याचा VIDEO VIRAL

वधूनं लग्नमंडपात प्रवेश करण्यापूर्वी आणि स्टेजवळ आल्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून ओपन फायरिंग (Firingbaaz Bride) केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत आहे.

वधूनं लग्नमंडपात प्रवेश करण्यापूर्वी आणि स्टेजवळ आल्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून ओपन फायरिंग (Firingbaaz Bride) केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत आहे.

वधूनं लग्नमंडपात प्रवेश करण्यापूर्वी आणि स्टेजवळ आल्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून ओपन फायरिंग (Firingbaaz Bride) केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत आहे.

प्रतापगड, 1 जून : गावातील शहरातील नेते, नेत्यांची मुलं, गावगुंड अनेकदा वाढदिवसाच्या पार्ट्या, लग्नसोहळे यामध्ये आनंदोत्सव म्हणून गोळ्यांचे बार उडवताना किंवा नंग्या तलवारी नाचवताना दिसतात. अशा प्रकारचे ओपन फायरिंग किंवा तलवारी प्रदर्शन कायद्यानं गुन्हा असतानाही असे प्रकार घडत असतात. ते समोर आल्यानंतर पोलीस कारवाईही होते. तरीही असे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. आता एका वधूनं लग्नमंडपात प्रवेश करण्यापूर्वी आणि स्टेजवळ आल्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून ओपन फायरिंग (Firingbaaz Bride) केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील असून यामध्ये वधू स्टेजवर चढण्यापूर्वी रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळ्या झाडताना दिसत आहे. रूपा पांडेय (bride Roopa Pandey) असे वधूचे नाव असल्याचं समजलं आहे. 30 मे रोजी संध्याकाळी हा विवाह सोहळा झाला आहे.

" isDesktop="true" id="559217" >

जेठवारा पोलीस ठाण्यातील लक्ष्मणपूर गावात हे लग्न झाल्याचे सांगितले जात आहे. ही वधू येथील रामगया पांडेय यांची मुलगी असल्याचे समजते आहे. तसंच ही फायरिंग लायसन्स असलेल्या रिव्हॉल्वरमधून झाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाने अशा प्रकारच्या फायरिंगवर बंदी घातलेली असली तरी अशा घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

हे वाचा - Google Photos वर Free Unlimited Storage बंद; फोटो, व्हिडीओ स्टोरेजसाठी हे आहेत स्वत पर्याय

हौसे खातर लोक नियमबाह्य गोष्टी करतात, यामुळं नंतर त्यांना अडचण होऊ शकते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसांनी कारवाई केल्याचे वृत्त नाही, मात्र हा व्हिडिओ पोलिसांच्या पर्यंत पोहचल्यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Gun firing, Marriage, Uttar pradesh news