बदायू, 16 ऑक्टोबर : भाजप सरकार जेवढं महिलांच्या सक्षमिकरण आणि सुरक्षेसाठी नारे देत असतानाच त्याच राज्यातील पोलीस मात्र महिलांवर होणाऱ्या अन्यायाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. वर्दीत असलेल्या महिलेला तिच्या पतीने भररस्त्यात मारहाण केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी कठोर कारवाईसाठी पावलं उचलल्याचं दिसत नाही. केवळ आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे उत्तर प्रदेशातील बदायू इथे ही घटना समोर आली आहे. कोरोना रुग्णालयातून आपली ड्युटी संपवून जात असताना वर्दीतल्या महिलेला तिच्या पतीने गाठलं आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हे दृश्य पाहिलं मात्र त्याला रोखण्यासाठी कोणी समोर आलं नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 323 आणि 504 कलमाअंतर्गत महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला.
हे वाचा-मोबाईल दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट, पाहा अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO
वर्दीतल्या महिलेला अशापद्धतीनं मारणं किती योग्य आहे? वर्दीचा आणि महिलेचा हा अपमान किती अमानुषपणाचा कळस आहे ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या लोकांनी देखील बघ्याची भूमिका घेतली आङे.
आलापूर पोलिस ठाण्यात तैनात महिला कॉन्स्टेबलचे दोन व्हिडीओ तिच्या पतीने व्हायरल केले आहेत. महिला कोरोना हॉस्पिटल एल वन सेंटर, आसरा येथील निवासस्थानातून ड्यूटी करून आलापूर पोलिस ठाण्यात परत येत होती. तिचा नवरा वाटेवर आला. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर नवऱ्यानं या वर्दीतल्या महिलेला बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.