VIDEO : निदर्यीपणाचा कळस! दिव्यांग व्यक्तीला पोलिसानं फरफटत नेलं

VIDEO : निदर्यीपणाचा कळस! दिव्यांग व्यक्तीला पोलिसानं फरफटत नेलं

या संपूर्ण घेटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला आहे.

  • Share this:

कनौज, 19 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात एकीकडे पोलिसांनी मदत केलेल्याचे अनेक प्रसंग समोर येत होत असताना सोशल मीडियावर मात्र एक मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अपंग असलेल्या व्यक्तीला धक्के मारत आणि फरफटत पोलीस ठाण्यात घेऊन जात आहे. याच दरम्यान आपल्या पतीला वाचवण्यासाठी त्याची गर्भवती पत्नी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते मात्र पोलीस आपल्या वर्दीचा धाक दाखवून फरफटत दिव्यांग व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन येतात.

या संपूर्ण घेटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगडचे IPS अधिकारी आर. के. वीज यांनी ट्वीट करून दिव्यांग व्यक्तीसोबत अशा पद्धतीनं वागण गैर असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं उत्तर प्रदेश पोलिसांना टॅक केल्यानं सोशल मीडियाावर चर्चेला उधाण आलं आहे.

हे वाचा-महिलेला अडवून केला गँगरेप,पुतण्यालाही करायला लावले अत्याचार;VIDEO केला व्हायरल

दिव्यांग व्यक्तीसोबत घडलेल्या प्रसंगानंतर या प्रकरणी तातडीनं वरिष्ठांकडून सौरिख पोलीस ठाण्यात एसपीकडून चौकशीचे आदेश दिले असून या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओवरून संताप व्यक्त होत आहे. युझर्सनी पोलिसांवर टीका केली आहे. एका युझरनं तर उत्तर प्रदेशातील पोलीस हे नागरिकांसोबत असेच वागतात त्यामुळे ही खूप सामान्य गोष्ट असल्याचंही म्हटलं आहे. अनेक युझर्सनी योगी आदित्यनाथ सरकारवरही निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळे सोशल मीडियातून संताप व्यक्त होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 19, 2020, 9:53 AM IST

ताज्या बातम्या