Home /News /viral /

12 वर्षांच्या मुलानं दीड वर्षांच्या चिमुकल्याला मालगाडीखाली फेकलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

12 वर्षांच्या मुलानं दीड वर्षांच्या चिमुकल्याला मालगाडीखाली फेकलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

दीड वर्षांचा चिमुकला मालगाडी आल्याची थरारक घटना समोर आली आहे.

    आग्रा, 23 सप्टेंबर : चिमुकल्याला अगदी डोळ्यादेखत खरचटलं किंवा जराजरी लागलं तरीदेखील आपल्या डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहात नाही. दीड वर्षांचा चिमुकला मालगाडी आल्याची थरारक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एका युवकाला काही लोकांनी पकडून ठेवलं आहे आणि मालवाहू गाडीखाली आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या चिमुकल्याला युवकानं फेकल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केला आहे. दरम्यान मोटर मॅनच्या सतर्कतेमुळे सुदैवानं मोठा अनर्थ घडला नाही. हा चिमुकला रडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे वाचा-'मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ??' या चिमुकल्याला मालवाहून गाडीखालून सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं. मात्र हा चिमुकला इथे कसा आला? कोणाचा याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती दिली असून सध्या तपास सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार घडत असताना घटनास्थळावर एक मुलगी येते आणि काय झालं विचारते? त्यावर ट्रेनमध्ये असणारा तरुण हे मुलं तुमचं आहे का? विचारतो त्यावर ते माझं नाही असं उत्तर देते.मिळालेल्या माहितीनुसार 12 वर्षांच्या या अल्पवयीन मुलानं दीड वर्षांच्या चिमुकल्यालाच मालगाडीखाली फेकल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आग्रा इथला असल्याची माहिती मिळाली असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh, Viral video.

    पुढील बातम्या