BMW कारमधून जाणाऱ्या तरुणांची गुंडगिरी, भरचौकात दाम्पत्यावर चालवली गोळी, पाहा LIVE VIDEO

BMW कारमधून जाणाऱ्या तरुणांची गुंडगिरी, भरचौकात दाम्पत्यावर चालवली गोळी, पाहा LIVE VIDEO

या घटनेचा व्हिडीओ मागच्या गाडीतील चालकानं कॅमेऱ्यात कैद केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. BMW कारमधून फिरणाऱ्या तरुणांनी हैदोस घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

गाझियाबाद, 19 नोव्हेंबर : BMW कारने जाणाऱ्या तरुणांनी परिसरात बंदुकीचा धाक दाखवून हैदोस घातला आहे. दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यासोबत झालेल्या वादातून BMWमधून जाणाऱ्या अज्ञात तरुणांनी गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ मागच्या गाडीतील चालकानं कॅमेऱ्यात कैद केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. BMW कारमधून फिरणाऱ्या तरुणांनी हैदोस घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी BMW कार आणि गुंडगिरी करणाऱ्या तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुदैवानं दुचाकीस्वाराच्या अंगाला गोळी घासून गेली त्यामुळे त्याचा जीव वाचला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. भररस्त्यात हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलीस स्टेशन कविनगर भागातील अवंतिका परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कारमधून थेट गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यानं जात असताना दुचाकीस्वाराची धडक कारला झाली. दुचाकीस्वार कार चालकाची माफी मागण्यासाठी पुढे सरसावला पण चालकानं थेट गोळीबार केला.

सुदैवानं दुचाकीस्वाराला गोळी लागली नाही. गोळीबार केल्यानंतर कार घेऊन चालक फरार झाला आहे. या प्रकरणी व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली असून चालकाचा तपास सुरू आहे. दुचाकीस्वाराला ही गोळी लागली नाही. मागून येणाऱ्या चालकानं दुचाकीस्वाराला गोळी लागली का विचारणा केली आणि पोलीस तक्रार दाखल कऱण्याचा सल्लाही दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेपूर्वी देखील BMW कारमधून जाणाऱ्या तरुणांनी दोन ठिकाणी गोळीबार केला होता.

Published by: Karishma Bhurke
First published: November 19, 2020, 2:17 PM IST

ताज्या बातम्या