एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; महापुरानं घरंच नेलं, अंगावर शहारे आणणारा VIDEO

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; महापुरानं घरंच नेलं, अंगावर शहारे आणणारा VIDEO

महाराष्ट्रातही पुरानं हाहाकार केला आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • Share this:

लखीमपूर खीरी, 30 ऑगस्ट : उत्तर भारतात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुठे गाड्या अडकल्या आहेत तर कुठे लोक. अनेकांची घर या पुरात वाहून गेली आहेत. सलग चार दिवस पावसानं केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे पुराचं संकट ओढवलं आहे. या पुरामुळे उत्तर भारतातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथे अख्ख घर पुरात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अख्ख घरच पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं खळबळ उडाली आहे. दोन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.

हे वाचा-आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार पाऊस, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी

दुसरीकडे महाराष्ट्रातही पुरानं हाहाकार केला आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात विदर्भ, मराठवाडा मागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार मांडला आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती देण्यात येत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 30, 2020, 2:00 PM IST

ताज्या बातम्या