सहारनपुरा, 29 ऑगस्ट : उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी लोक अडकले तर काही ठिकाणी गाड्याही वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथे पूर आला आहे. या पुराचा फटका अनेक घरांना आणि नागरिकांना बसला. या पुरात उत्तराखंड सीमाभाग असलेल्या शकुंभरी देवी मंदिराजवळ एक कार या पुरात वाहून गेली आहे. स्थानिक लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH म.प्र. छिंदवाड़ा : माचागोरा डैम से प्रभावित बेलखेड़ा गांव में लगभग 24 घंटों से तेज पानी के बहाव के कारण एक टापू के बीच फंसे एक आदमी को एयरलिफ्ट किया गया। pic.twitter.com/Se9Kf2yuhw
मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात अनेक ठिकाणी 24 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक या पुरात अडकले होते. या पुरात अडकलेल्या एका तरुणाला हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं वाचवण्यात यश आलं आहे. छत्तीसगडमध्ये देखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून वाहानं पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे.