CCTV VIDEO : वडिलांचे लक्ष नसताना वाढवली गाडीची रेस, उकळत्या तेलात पडली चिमुकली

CCTV VIDEO : वडिलांचे लक्ष नसताना वाढवली गाडीची रेस, उकळत्या तेलात पडली चिमुकली

अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ CCTVमध्ये कैद

  • Share this:

झांसी (उत्तर प्रदेश), 12 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशच्या झांसी येथे एक भयंकर अपघात घडला. हा अपघात दोन दुचाकींमध्ये नाही तर त्याहूनही भयंकर घडला आहे. एका दुचाकीवर एक मुलगी आपल्या वडिलांसोबत बसली होती. मात्र अनपेक्षितपणे या चिमुकल्या मुलीनं गाडी रेस केली आणि मुलगी थेट डिशवॉशरवर आदळली. हा व्हिडीओ खरतर अंगावर शहारे आणणारा आहे.

उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील सिप्री बाजार खन्ना येथे ही दु:खद घटना घडली आहे. वडील व मुलगी डंडन रोडवरील रेस्टॉरंटच्या बाहेर दुचाकीवर बसले आहेत. हा प्रकार घडला तेव्हा वडील मागे बसले होते आणि मुलगी त्यांचासमोर बसली होती. अचानक, या मुलीनं चुकून गाडी रेस केली आणि थेट जवळच असलेल्या हॉटेलमध्ये शिरली. एवढेच नाही तर बाहेरच असलेल्या तेलाच्या भरलेल्या कढईत ही मुलगी पडली.

वाचा-जगातभारी! चक्क बॉसनं धुतले कर्माचाऱ्यांचे पाय, पाहा VIRAL VIDEO

दरम्यान, बाबांसोबत रस्त्याच्या कडेला उभे असताना गाडी चालू ठेवल्यामुळं चिमुकलीनं गाडी रेस केली. यात कोणत्याही गाडीचा धक्का लागलेला नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

वाचा-आता माझी सटकली! धावत्या कारवर बसला हत्ती आणि...,पाहा हा थरारक VIDEO

यानंतर लगेचच मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्हिडीओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. दरम्यान ही मुलगी किती भाजली आहे किंवा तिच्या प्रकृतीबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही आहे.

वाचा-चड्डी घालून नवा मोगली करतोय सचिनसारखी तुफानी बॅटिंग! पाहा VIRAL VIDEO

BREAKING VIDEO : कोण होणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची आहे चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 07:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...