मथुरा, 28 नोव्हेंबर : दिवसेदिवस गुन्हेगारी आणि चोरीचे प्रकार वाढताना दिसत आहे. तर शहरात गुंडगिरी वाढल्यानं पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. भर दिवसा काही तरुणांनी दुकानात शिरून मालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सुरुवातीला एक आणि त्यामागून दोन तरुण दुकानात जबरदस्ती घुसतात आणि दुकानदाराला बेदम मारहाण करतात. त्या दुकानदाराची कॉलर पकडून त्याला खाली जमिनीवर ढकलून देतात आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा परिसरात पोलीस ठाणा क्षेत्रात घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचा-भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील वाढत्या गुंडगिरीविरोधात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आणि पोलीस प्रशासन काही ठोस पावलं उचलणार की नाही असा सवाल देखील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दिवसाढवळ्या वाढणाऱ्या या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मथुरेतील कोतवालीपासून काही अंतरावर असलेल्या दुकानात गुंडगिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. काही तरुणांनी कपड्यांच्या शो रूममध्ये घुसून दुकानदाराला बेदम मारहाण केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh, Viral video.